नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव शाळेत अशोक कुमावत सरांचे व्याख्यान
फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास : कवितांनी पाणावले डोळे, ४३ वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव! क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव शाळेत अशोक कुमावत सरांच्या व्याख्यानाने नवचैतन्य नाशिक - माझे कपडे फाटके होते, दप्तर फाटके होते, पण स्वप्न फाटके नव्हते... या एका वाक्याने सभागृहात शांतता पसरली. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या त्यांच्या जन्मभूमीत एका भाग्यवान सुपुत्राचा सन्मान सोहळा शिक्षक दिनी पार पडला. १९८३ साली ज्या शाळेत हा विद्यार्थी फाटक्या चड्डीत आणि अनवाणी पायाने शिकला, रद्दीच्या कागदाच्या शिवलेल्या वह्या आणि वडिलांनी उसन्या-पासण्या आणलेल्या जुन्या पुस्तकांवर शिक्षण घेतले, ज्या शाळेचे वर्ग गावच्या पडक्या मारुती, विठ्ठल आणि राम मंदिरात भरायचे, त्या आज भव्य दिमाखात उभ्या असलेल्या वैभवशाली शाळेत ४३ वर्षानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याच विद्यार्थ्याचा प्रमुख व्याख्याता म्हणून गौरव झाला. हे भाग्यवान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रपती पुर...