- कोल्हापूर महापालिकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमांबाबत महापालिकेत सविस्तर चर्चा झाली असून, कोणावरही अन्याय न होता आकृतीबंधामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- महापालिका सभेत १० सहाय्यक आयुक्त आणि ५ उपायुक्तांऐवजी ५ सहाय्यक आयुक्त आणि दोन उपायुक्त असावेत, अशी मागणी करण्यात आली.
- नगरसेवकांनी महापालिकेची रचना व कार्यपद्धती आणि कामगार विभागाच्या कामकाजावर ओढले ताशेरे.
- सण, उत्सव, मिरवणुकीत किंवा सार्वजनिक ठिकाणांहून चोरीला गेलेले अथवा गहाळ झालेले सव्वा कोटी रुपयांचे ४०० मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.
- गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मतदानासाठी अपात्र ठरलेल्या दूध संस्थांना सर्किट बेंचचा दिलासा मिळाला असून, अवसायनातील संस्था पात्र तर कार्यक्षेत्राबाहेर संस्थांना ठरावधारक प्रतिनिधी बदलण्याची संधी मिळाली आहे.
- नदी पुनरुज्जीवन योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा समावेश करण्यात आला असून, पाणी आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर येथून केली.
- विविध प्रलोभनं दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या आणि पसार असलेल्या 'ए. एस. ट्रेडर्स'चा एजंट अभिजित शेळकेला पोलिसांनी अटक केली आहे.
- भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचे मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर झाले असून, लवकरच कर्नाटकात विस्तार होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ. अरुंधती महाडिक यांनी ही माहिती दिली.
- आमदार राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोल्हापुरातील शिवाजी चौकात आमने-सामने आले. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली.
- सिद्धगिरी मठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून संवेदनशील आणि तज्ञ पशुवैद्यक घडणार असून, ग्रामीण भागाच्या विकासात पशूधनाचे मोठे योगदान असल्याचे उद्गार नामदार पंकजा मुंडे यांनी काढले.
- एसआयआर नोंदणीत साडेचार लाख मतदार कमी होणार असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात वाढणार ५ मतदान केंद्रं
- लिंगायत समाजासाठी अमृत संस्थेच्या योजनांचा मार्ग मोकळा, अमृत संस्थेच्या लक्षित गटात समावेशाचा राज्य शासनाचा निर्णय
- शक्तीपीठ महामार्गाच्या ई-नोटीसींची सामूहिक होळी, गारगोटीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमीन मोजणीला तीव्र विरोध करत आमदार राजेश क्षीरसागर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
- कोल्हापूर महानगरपालिकेतील नूतनीकरण केलेल्या महापौरांच्या कार्यालयाचं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं उद्घाटन
- एनसीएमसी कार्डबाबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी, एस. टी. महामंडळाकडून १४ सप्टेंबरपर्यंत सवलत योजना सुरू ठेवण्याचा निर्णय
- यंत्रमाग कारखान्यातील कांडी मशीनमध्ये अडकून वृद्ध महिलेचा मृत्यू, इचलकरंजीतील घटनेमुळे औद्योगिक अपघातांची तीव्रता पुन्हा स्पष्ट
- जुनी पेन्शन चालू करावी या मागणीसाठी शिक्षक दिनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मूक मोर्चा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार
- हॉटेलसमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून इचलकरंजीतील माजी नगरसेवक आणि हॉटेल चालकाच्या कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी
- ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतून गेलेली प्रमोद चौगुले यांची २२ लाखाची रक्कम सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिली पुन्हा मिळवून
- कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, जमीन मोजणीसाठी आल्यास अधिकाऱ्यांना चोपणार, राजू शेट्टी यांचा पुन्हा इशारा, आमदार राजेश क्षीरसागर हा विषय आपल्यासाठी गौण असल्याचा टोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा