आजच्या महत्त्वाच्या बातम्या

           नगरसेवक आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यातील वाद पुन्हा उफाळला, कोल्हापूर महापालिका चौकात शड्डू ठोकून एकमेकांना बघून घेण्याचा इशारा, अखेर पोलिसांचा हस्तक्षेप
          नगरसेवक फरास आणि देशमुख यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या आवारात बोलवल्यानं वातावरण बनलं तणावपूर्ण, महापौर रूपाराणी निकम यांची मध्यस्थी
                अमेरिकन बंगला मिशनच्या ४८ एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवून, त्या जागेवर जिल्हाधिकारी कार्यालयासह भक्त निवास आणि पार्किंगची सुविधा करावी, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांची मागणी
            गोकुळच्या प्रारूप मतदार यादीतील दूध संस्थांच्या अपात्रतेवरून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सहाय्यक निबंधक कार्यालयात कार्यकर्त्यांचा प्रचंड गोंधळ
               कमी व्याजदरात व्यवसायासाठी कर्ज मिळवून देऊ, अशी बतावणी करून ६५ वर्षांच्या जोतिबा पाटील यांची ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक, सायबर क्राईमचा नवा फंडा
            ४० वर्ष शिवसेनेचा निष्ठावंत असूनही मंत्रिपद मिळत नसल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली खंत, नेत्यांनी शब्द पाळून अडीच वर्षासाठी संधी देण्याची मागणी
          हुपरीतली गायरान जमिनीवर केलेलं अतिक्रमण जमीनदोस्त केलं नाही तर १३ सप्टेंबर रोजी त्याच जागेवर वराह जयंती करणार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा
               रुई पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
           राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीतही असणार मंडळांसाठी सिग्नल, डॉल्बी-लेसर आणि स्मोकला बंदी, पोलिस अधीक्षकांची केली आगमन मिरवणूक मार्गाची पाहणी
        कोल्हापुरातील रंकाळा टॉवरजवळील कठड्यावर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन पडल्यानं उपचारापूर्वीच मृत्यू, जुना राजवाडा पोलिसात नोंद

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि विकासकामे तसंच विविध योजना घरोघरी पोहचवण्यासाठी मोदी विचार मंच कार्यकर्त्यांचं जाळं विणणार, नरेंद्र मोदी विचार मंचची माहिती
  • गारगोटीतील सनी परिटला मारहाण केल्याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात ठिय्या, पीएसआय योगेश गोरेसह अन्य पोलिसांना निलंबित करण्याची मागणी
  • पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी केली स्वतःची उमेदवारी जाहीर
  • येत्या तीन वर्षात महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा शासनाचा निर्धार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
  • करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या दलित वस्ती विकासाचा २५ लाख रुपयांचा निधी परत जाणार असल्यानं दलित समाज आक्रमक, उपसरपंच आणि सदस्यांना अपात्र करण्याची मागणी
  • शेतकरी कामगार पक्षाच्यावतीनं झाली घरमालक संघटनेची बैठक, कोल्हापूर शहरातील घरमालकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
  • कोल्हापुरात निघाला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मूक मोर्चा, जळगाव जिल्ह्यातील शिवरे इथल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
  • शेतकरी आणि कोल्हापूरची स्वाभिमान जनताच आमदार राजेश क्षीरसागर यांचा टांगा पलटी करेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया
  • इचलकरंजीतील राजेशकुमार जोशी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात ९ जण दोषी, एकाला जन्मठेप तर ८ जणांना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
  • साखरेच्या साठेबाजीवर पुन्हा निर्बंध, आता २ हजार क्विंटलपेक्षा जादा साखर एका ठिकाणी साठा करता येणार नाही, ऐन सणासुदीत साखरेचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न
  • कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करून कुणबी दाखले वितरित करावेत, सकल मराठा समाजाची मागणी

टिप्पण्या