अखिल भारतीय माहिती अधिकार महासंघाच्या (ABIMA) महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी योगेश तानु पेढांबकर यांची निवड
अखिल भारतीय माहिती अधिकार महासंघाच्या (ABIMA) महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी योगेश तानु पेढांबकर यांची निवड
रत्नागिरी / चिपळूण:
पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहक्क या मूल्यांसाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय माहिती अधिकार महासंघाच्या (ABIMA) महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी चिपळूण (रत्नागिरी) येथील श्री. योगेश तानु पेढांबकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून ही निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणणे, सामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणे, आणि शासकीय कामांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी योगेश पेढांबकर सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या याच सामाजिक कार्याची आणि तळमळीची दखल घेऊन महासंघाने त्यांना 'महाराष्ट्र राज्याध्यक्ष' पदाची जबाबदारी दिली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
नागरिकांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन
"माहितीचा अधिकार — नागरिकांचा अधिकार" या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी 'अखिल भारतीय माहिती अधिकार महासंघ' कटिबद्ध आहे.
या जनचळवळीचा भाग होण्यासाठी, माहिती अधिकाराचा अभ्यास व वापर शिकण्यासाठी, तसेच समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी महाराष्ट्रभरातील सुजाण नागरिक, तरुण, सामाजिक कार्यकर्ते यांनी महासंघासोबत मोठ्या संख्येने जुळावे, असे जाहीर आवाहन नवनियुक्त राज्याध्यक्ष श्री. योगेश पेढांबकर यांनी केले आहे.
उद्दिष्टे:
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण व प्रबोधन
प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे
माहिती अधिकाराच्या माध्यमातून तळागाळातील समस्यांना वाचा फोडणे
📞 संपर्क व अधिक माहितीसाठी:
पत्ता: समाज मंदिर जवळ, पेढांबे, भराडेवाडी, चिपळूण, रत्नागिरी - ४१५६०३.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा