शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचे राज्यव्यापी आंदोलन; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह केजी ते पीजी मोफत व समान शिक्षणाची मागणी
मुंबई, प्रतिनिधी- ( युवराज पाटील ) दि. 1 सप्टेंबर 2026 : राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्यालय बंद करू नये, प्रत्येक वर्गाला व प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र' यांच्या वतीने 5 ऑक्टोबर 2026 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. सिद्धार्थ जगदेव, तुषार सूर्यवंशी, संजय वेतुरेकर, दीप्ती शेलार, सुभाष मोरे, प्रवीण किणे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई यांनी सांगितले की, "राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्या बंद होता कामा नये. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार असून ग. वाडी आणि वस्तीपर्यंत शाळा उपलब्ध राहिली पाहिजे."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा