बातमीपत्र

  • इ चलनाबाबत शासनाच्या फसव्या आश्वासनामुळे वाहतूकदारांचा उद्रेक, कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयात घुसवल्या ५० पेक्षा अधिक खाजगी आराम बसेस.
  • बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या एसपी गँगवर राज्यातील पहिलीच मोका कारवाई, स्वप्निल पाटीलसह ११ जणांवर आवळला कायद्याचा फास.
  • गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदारयादीतील ४९४ दूध संस्थांच्या हरकतींवर सुनावणी, प्राथमिक दूध संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारकांविरोधात जोरदार युक्तीवाद.
  • सीपीआरमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी करावी लागते तीन महिन्यांची प्रतीक्षा, नागरिक वैतागले.
  • टक्केवारी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प रखडले, माजी खासदार राजू शेट्टी यांचा घणाघात, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे पुढील १५ दिवसांत करणार प्रत्यक्ष पाहणी.
  • स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही.
  • कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आयुक्तांनी माफी मागावी आणि शहर अभियंत्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची मागणी.
  • राज्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४.२७ मिलिमीटर पावसाची नोंद, पंचगंगा नदीची पाणी पातळी १८ फुटावर.
  • अलमट्टीसह कोल्हापूर जिल्ह्यातील १० धरणात शंभर टक्के पाणीसाठा, शेती आणि पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली.
  • चंदगड तालुक्यातील हेरे गावात उभारणार हेलिपॅड, हेरे गावाच्या विकासाला टेकऑफ मिळण्याची आशा.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात महिला उद्योजकांचा वाढता सहभाग, केंद्रीय जीएसटी आयुक्त सुमितकुमार यादव यांचे मत, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महिला उद्योजक मेळावा संपन्न.
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गावरील कामे त्वरित पूर्ण करावीत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश.

टिप्पण्या