ठळक घडामोडी

      कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती आणि पोलीस अधीक्षकांची झाली बैठक, पारंपरिक वाद्यांचा वापर करून आगमन मिरवणुकीला मिळाली संमती
     सभासद होण्यासाठी पात्र नसणाऱ्या त्या ४१० प्राथमिक दूध संस्थांना गोकुळच्या मतदार यादीतून वगळावं, सुनावणी दरम्यान तक्रारदारांकडून युक्तीवाद, तर राजकीय हेतूनं केलेल्या तक्रारीची दखल घेऊ नये, दूध संस्थांची मागणी
           रंकाळा प्रदूषण मुक्तीचं कारण दाखवून १२ कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा आमदार क्षीरसागर आणि महापालिका अधिकाऱ्यांचा घाट, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचा आरोप
           दिवसभर पावसाची उघडझाप, श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू, काळम्मावाडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा, यंदा परतीचा पाऊस लवकर माघारी फिरण्याची शक्यता
                मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यानंतर यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लवकर सुरू होण्याची शक्यता, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पावसाचा अंदाज
          अंधत्वावर मात करत वाघवे गावच्या शरद पाटील यांचं स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश, मत्स्य विभागात क्लार्कपदी निवड
        राजाराम बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न करणारं श्वान पंचगंगा नदीत गेलं वाहून, जिवाच्या आकांतांन पोहून श्वान आलं नदी काठावर, राजाराम बंधाऱ्यावरील धोका पुन्हा एकदा स्पष्ट
             जादा परताव्याच्या आमिषानं ९८ लाख ९६ हजारांची फसवणूक करून पसार झालेल्या लाईफमार्क रिअल इस्टेट कंपनीच्या संचालक आणि एजंटला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक
           पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये विविध उपक्रमांसह निघाल्या शोभायात्रा.                                                        उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नावानं स्मृतीद्वाराची उभारणी, शिरोळ तालुक्यातील अण्णाप्रेमींमध्ये अभिमानाची भावना
         कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीनं सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या दोन लाख राख्या, मराठा बटालियनकडं राख्या सुपूर्द
           इचलकरंजीतील शहापूर खणीतील पाण्यानं तळ गाठला, गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाचा प्रश्न होणार बिकट
             एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांसह एका क्लास चालकाचा समावेश
             वनकर्मचाऱ्यांसाठी झाला आरोग्य तपासणी आणि रक्तदान उपक्रम, नियमित तपासणी हाच आरोग्य रक्षणासाठी पहिला उपाय, डॉ. संदीप पाटील यांचा सल्ला
          करवीर तालुक्यातील वडणगेमधील देवी पार्वती हायस्कूलमध्ये झाला इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा
            संरक्षण क्षेत्रात आता भारत निर्यात करणार, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची उत्पादन क्षमता वाढली, एमसीसीआईए संरक्षण समितीचे सहअध्यक्ष हर्ष गुणे यांची माहिती
                    ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीनं झाला दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
             धाप लागण्याचं निमित्त होऊन कंडक्टरचा अवघ्या तीन तासात उपचारादरम्यान झाला मृत्यू, हरिओम नगरमधील रुग्णालयातील घटना, डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

टिप्पण्या