बातमीपत्र

  • कोल्हापुरातील शेरे इनाम जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार, जनगणना पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर महसूल विभागीय आयुक्त कार्यालयासंबंधी निर्णय घेणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
  • कोल्हापूर बाजार समितीचं राष्ट्रीय बाजार समितीमध्ये रूपांतर होणार नाही, पणन मंत्री जयकुमार रावळ यांचं स्पष्टीकरण
  • पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ जगातील सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणन मंत्री जयकुमार रावळ यांची माहिती
  • आशियाई बँकेच्या अर्थ सहाय्यातून राज्यातील बाजार समित्यांचं बळकटीकरण करण्याचा प्रस्ताव, पणन मंत्र्यांची माहिती
  • सेस वसुली बंद केल्यास बाजार समित्या टिकणार नाहीत, त्यामुळे सेस वसुली तुर्तास बंद करता येणार नाही, पणन मंत्री जयकुमार रावळ यांचं स्पष्टीकरण
  • बाजार समित्यांमधील नोकर भरती होणार त्रयस्थ यंत्रणेमार्फत, मनमानी नोकर भरतीला बसणार चाप
  • हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं एका प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण गोदाम जळून खाक, सुमारे ५० लाख रुपयांचं नुकसान
  • रंकाळा चौपाटी आणि पदपथ उद्यानाची दुरावस्था, पावसामुळे वाढलेलं गवत काढलं नसल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा वाढला वावर
  • महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या वडापावचा चमचमीत आणि खुसखुशीत प्रवास, आजच्या जागतिक वडापाव दिवस
  • जयसिंगपुरात आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, मच्छी मार्केट परिसरासह शहरात खळबळ
  • राज्यातील काँग्रेस पक्षाला खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भीती का वाटते, खासदार सुप्रिया सुळे यांचा कोल्हापुरात सवाल
  • निर्मलादेवी महिला मंचाच्यावतीनं गौराईला साडी नेसवण्याचं प्रशिक्षण, एका वेगळ्याच कलेच्या सादरीकरणानं सारेच भारावले
  • कागल तालुक्यातील म्हाकवेत चोरांचा धुमाकूळ, हनुमान मंदिरातील चांदीचा मुकुट, पितळेची गदा लंपास
  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन, राज्यातील नागरिक आणि बळीराजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी केली प्रार्थना
  • राज्यातील तेली समाजाच्या प्रलंबित १८ मागण्या मार्गी लावण्यासाठी येत्या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
  • आमदार विजय वडेट्टीवार यांनी आता फारकाळ विरोधी पक्षात राहू नये, नामदार बावनकुळे यांची खुली ऑफर
  • शिरोळ तालुक्यातील हेरवाड-माळभागात एकाच रात्री ४ घरफोड्या, ४ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
  • चंदगडच्या हाजगोळीत एम. डी. निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, एएनटीएफची धडक कारवाई, १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • जुन्या पेन्शन मागणीसाठी ५ सप्टेंबरला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निघणार मूक मोर्चा, शिक्षक संघटनांच्या कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धार
  • युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावं, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांचं आवाहन, कोल्हापुरात राज्यस्तरीय रेड रन, रेड रिबन प्रश्नमंजुषेसह जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
  • हातकणंगले तालुक्यातील यड्राव इथं हॉटेल व्यवस्थापकाचा दगडांनं ठेचून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक
  • भूमी अभिलेख विभागानं रद्द केलेला बिगर शेती मोजणी नकाशा वैध असल्याचं भासवत दस्तऐवजात समावेश करून फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील १२ जणांवर गुन्हा
  • हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं पिस्तुल निर्मिती प्रकरणात अर्शद अत्तार या आणखी एका संशयिताला अटक

टिप्पण्या