ठळक घडामोडी

आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेरा पूजन सोहळा गडहिंग्लज येथे संपन्न झाला त्यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील मान्यवर फोटोग्राफर या कार्यक्रमास उपस्थित होते
  • पाणी दरवाढ: अखेर पाणी दरवाढीला मिळाली कोल्हापूर महापालिका सभेत मंजुरी, मात्र नागरिकांच्या खिशाला परवडेल इतकी दरवाढ करण्याची उपसूचना
  • स्वतंत्र खाते: पाणी दरवाढीतून मिळालेले पैसे स्वतंत्र खात्यात जमा करून त्याचा विनियोग पाणी पुरवठा सुधारण्यासाठीच केला जाईल, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची ग्वाही
  • भीषण अपघात: कार आणि मोटरसायकलची धडक, शिये फाट्याजवळ झालेल्या अपघातात भादोलेमधील २६ वर्षीय वल्लभ संजय माने याचा मृत्यू, कारमधून बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक होत असल्याचा संशय
  • एसआयटी चौकशी: बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा, शिवसेना ठाकरे गटाचा भुदरगड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी
  • स्थानिक नागरिक नाराज: कोल्हापुरातील एसएससी बोर्ड चौक ते मोरेवाडीकडे जाणारा नवा रस्ता सुद्धा वादग्रस्त, बंद पथदिवे, उघडे डक्ट आणि ड्रेनेज चेंबरची कमकुवत झाकणं यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी
  • विशेष वृत्त: अनमोल क्षणांना अजरामर करणाऱ्या छायाचित्रण कलेच्या सन्मानासाठी साजरा होणाऱ्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम गडहिंग्लज येथे संपन्न झाले
  • जीवनगौरव पुरस्कार: प्रत्येक फोटो परिस्थिती बदलू शकत नाही, मात्र बदल घडवणारा माणूस तयार करू शकतो, पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
  • अतिक्रमण हटवली: गोकुळ शिरगाव परिसरातील महामार्गाच्या बाजूची अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवली
  • रस्त्यांची दयनीय अवस्था: कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि टिपर गाड्यांच्या प्रश्नावरून महापालिका सभेत अधिकारी धारेवर, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची अभद्र युती असल्याचा आरोप
  • पोलीस नोटीस: श्रावण महिन्यात सातेरी मंदिराच्या पूजेवरून वाद टाळण्यासाठी ४ गावातील प्रमुख पुजाऱ्यांची बैठक करवीर पोलीस ठाण्यात पडली पार, कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी बजावल्या नोटीसा
  • टिप्पण्या