आजचे बातमी पत्र

  • केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांची वाट न पाहता त्यांचा शोध घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने लाभ द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचे निर्देश, तर आपापल्या विभागातील त्रुटींचा अधिकाऱ्यांनी तातडीने निपटारा करावा, खासदार धैर्यशील माने यांच्या सूचना
  • रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज साखरेवर क्रांतिसिंह नानापाटील नगर परिसरात अज्ञात दोघांकडून पिस्तुलातून गोळीबार, साखरे गंभीर जखमी
  • मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे चक्क शेळीचा गोठा, प्रचंड अस्वच्छता आणि बेवारस गाड्या धुळखात पडून असल्याचं चित्र, पार्किंगच्या जागेचा योग्य वापर होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
  • शाहुपूरीतील भाजी मंडई, बी. टी. कॉलेज, साईक्स एक्सटेंशन परिसरातील अतिक्रमणांनी नागरिक वैतागले, बेशिस्त पार्किंग, रस्त्यावरच्या व्यवसायामुळे रोजच होते वाहतूक कोंडी, महापालिका आणि वाहतूक शाखेने कठोर उपाययोजना करण्याची गरज
  • सापांविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून त्यांचं जैव साखळीतील महत्व अबाधित ठेवण्याची गरज, जागतिक सर्प दिन विशेष...
  • इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आम आदमी पक्षाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, गाडीची अंत्ययात्रा काढून प्रतीकात्मक निषेध
  • शिरोली एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, शिरोलीच्या माजी उपसरपंचासह सहाजण एक वर्षासाठी हद्दपार
  • हातकणंगले तालुक्यातील यळगूड इथल्या मुख्याध्यापिकेची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ
  • डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हापूर शहरात नवीन आधार सेवा केंद्र प्रभावी भूमिका बजावेल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचा 
  • बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत
  • मुख्यमंत्र्यांना सुद्बुद्धी यावी आणि आषाढी एकादशी दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय व्हावा, यासाठी १८ जुलैला काढणार सुद्बुद्धी दिंडी, कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार, राजू शेट्टी यांनी केली घोषणा
  • मोरेवाडी नाका ते शांतीनिकेतन रोडवर अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती, युथ डेव्हलपमेंट फौंडेशनचं अनोखं आंदोलन
  • बेकायदेशीररित्या गोवा बनावटीचं मद्य विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या इचलकरंजीतील लालप्रसाद यादवला अटक, ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
  • हातात टाळ मृदंग, मुखात विठू नामाचा गजर आणि मनात विठू माऊलीच्या दर्शनाची आस अशा वातावरणात गावागावातील वारकरी दिंड्या, पायी चालत पंढरपूरकडं रवाना
  • एन. डी. च्या आंदोलनात अभ्यासपूर्ण, तत्वनिष्ठता आणि निडरपणाची जोड, डॉ. आनंद मेणसे यांचे उद्गार
  • इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये फुटीनंतर आव्हानात्मक मोबाईल स्टेटस वॉर, त्या नगरसेवकांसोबत शहराच्या विकासाची गती कायम ठेवणार, महापौर उदय धातुंडे
  • शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी शाळेत सहा विद्यार्थिनींना उंदरानं चावा घेतल्याने खळबळ, पालकांमधून संताप
  • केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून कोल्हापूरच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
  • वन जमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद होऊन, वन हक्क जमीनधारकांना मिळणार सुधारित सात-बारा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • टिप्पण्या

    news.mangocity.org