आज चे बातमी पत्र

  • जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, राजाराम बंधारा २८ फुटावर, पंचगंगा नदीचं पाणी पात्राशेजारी, २३ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरण भरलं ८४ टक्के
  • फुलेवाडीतील रिक्षा चालकाचा कंदलगाव इथं डोक्यात दगड घालून निर्घृण खून, परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
  • राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असल्यानं महाराष्ट्र देशात नंबर वन बनेल, आमदार राजेश क्षीरसागर यांचा विश्वास, लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ होण्याची शक्यता
  • श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामातील त्रुटींबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय संघटनांकडून जिल्हा प्रशासन धारेवर, तर सर्व कामं धार्मिक आणि शास्त्रीय पद्धतीनुसार करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचं एका दिवसात ४.१० लाख कोटी रुपयांचं नुकसान
  • सुरज साखरेवरील हल्ल्यासाठी पिस्तल आणि राउंड्स उत्तरप्रदेशातून आणलं, यश खैरे आणि दीपक विश्वकर्मा अटक, २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
  • मुरगूडात अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड, संशियतावर पोक्सो अंतर्गत गुन्हा, २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
  • कोल्हापुरातील विक्रम हायस्कूल ते सेवंथ डे स्कूलपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण, नागरिकांची होतीय कसरत
  • गडमुडशिंगीमधील विबग्योर हायस्कूलच्या कॅन्टीनची अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून १७ जुलै रोजी तपासणी, कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात आणि अन्न साठवणूक परिसरात स्वच्छतेसंदर्भात आढळल्यात्रुटी
  • आयटी निर्यात परिषदेत कोल्हापूरला मिळाले जागतिक भरारीचे पंख, भारत-अमेरिका व्यापार पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर
  • बँकॉक इथे भारत-थायलंड यांच्यातील उद्योग परिषद संपन्न, १३० कंपन्यांचा सहभाग
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सीपीआरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न, ५०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केलं रक्तदान
  • इचलकरंजी महापालिकेसमोर खाद्यपदार्थ गाळेधारकांचं लाक्षणिक उपोषण, गाळेधारकांचं संरक्षण आणि पुनर्वसन करण्याची मागणी
  • सशस्त्र दहशत माजवत महिन्याला ५० हजार खंडणीची मागणी, इचलकरंजीत १२ जणांवर गुन्हा दाखल
  • राजस्थानमधील प्रोसेस हाऊस बंदचा महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम, वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
  • स्वर्गीय गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या सदाबहार गीतांच्या मैफिलीने मिळवली रसिकांची वाहवा
  • वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या दुचाकी रॅलीला पोलीस उपाधीक्षकांनी परवानगी नाकारली
  •  
  • टिप्पण्या

    news.mangocity.org