विशेष बातमीपत्र

  • गोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी सभासदत्व रद्द केलेल्या ४१० दूध संस्थांना सहकार न्यायालयाचा दिलासा, प्रशासक मंडळाच्या ठरावाला स्थगिती
  • २२ कोटी रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापनाचा विषय इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर, सत्ताधारी भाजपामधील हाळवणकर आणि आवाडे गटात फूट पडल्याचं स्पष्ट
  • महापालिका निवडणुकीत विरोधी प्रचार केल्याच्या रागातून आणि रस्त्याच्या कामाविरुद्ध तक्रार केल्यानं चिडून, कंत्राटदार गणेश खाडेकडून सुरज साखरेवर जीवघेणा हल्ला केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न
  • शाहू स्टेडियम मधील बहुसंख्य दुकानगाळ्यांची भीषण अवस्था, जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि चिखलाची दलदल, जागेची मालकी राज्य शासनाची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनीच देखभाल दुरुस्तीसाठी लक्ष देणं गरजेचं
  • कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स आणि अन्य कंपन्याच्या संचालक आणि एजंटांच्या जामीन अर्जावर सर्किट बेंचमध्ये झाली सुनावणी, सहापैकी चौघांचा जामीन मंजूर
  • विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील आरोपी शिक्षकाला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ हेरवाडमध्ये झालं गाव बंद आंदोलन
  • कोल्हापूर - सांगली महामार्गावर हेरले जवळ रविवारी रात्री झाला अपघात, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ४८ वर्षांच्या दीपक तुकाराम कदम यांचा जागीच मृत्यू
  • आयशर ट्रकची दुचाकीला धडक, इचलकरंजीतील महिलेचा जागीच मृत्यू, तर दुचाकीस्वार जखमी, मयूर पेट्रोल पंपासमोरील रविवारी रात्रीची दुर्घटना
  • ५ दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागून सेन्सेक्समध्ये ७७६ अंकांची वाढ, तर निफ्टीमध्ये २२१ अंकांची तेजी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ५ लाख कोटींची भर
  • कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना ई-सेवा केंद्र चालवण्यासाठी प्राधान्य द्यावं, रेशन धान्य दुकानदारांची मागणी
  • बँकिंग नियमांचं उल्लंघन करून कर्ज वितरण केल्यामुळे केडीसीसी बँकेला १३ लाख रुपयांचा दंड, नुकसानीला जबाबदार धरून केडीसीसी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करावं, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी
  • कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून कोल्हापुरातील मराठा लाईट इन्फंट्रीच्यावतीनं झालं बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं अनावरण
  • केवळ रस्ते आणि गटारीच्या कामांमध्ये अडकून पडू नका, गावांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्याला प्राधान्य द्या, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद सदस्यांना सल्ला
  • जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडं येणाऱ्या निधीच्या वितरणाचे शंभर टक्के अधिकार सदस्यांना द्यावेत, नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडं मागणी
  • रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व्हचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
  • शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध, माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचं सुरू झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
  • बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी करवीर पोलिसांचा कळंब्यातील थ्रीस्टार लॉजवर छापा, सुत्रधार पसार, २ महिला एजंटांना अटक
  • योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांचं उचगाव मधील मंगलम हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन, १० तास मृतदेह पडून
  • रवींद्र आणि तेजस बावणेवर सशस्त्र हल्ला केलेल्या चौघांची शाहूपुरी पोलिसांनी काढली कदमवाडी परिसरात धिंड, दहशत माजवणाऱ्यांचा उतरवला माज
  • टिप्पण्या

    news.mangocity.org