आज चे बातमी पत्र

सुमारे १५ लाख भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये आषाढी वारी संपन्न,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली शासकीय महापूजा,
राज्यातील बळीराजा सुखी राहण्यासाठी प्रार्थना
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशी यात्रेनिमित्त
भरला वैष्णवांचा मेळा, विठू नामाच्या गजरात आणि भाविकांच्या अमाप उत्साहात
पार पडला रिंगण सोहळा
आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना विविध राजकीय पक्ष, संघटना,
व्यक्ती आणि संस्थांकडून झालं फराळ वाटप
अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सीजेपी पार्टीच्या आंदोलनाला
मोठं यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीत बोलावल्याबद्दल
राजकीय चर्चांना उधाण
शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही, भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी इथं झालेल्या
महाराजस्व अभियानाचं महत्त्व खासदार धनंजय महाडिक यांनी केलं स्पष्ट
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठू रायाला
साकडं, महामार्ग विरोधी समितीनं काढली नंदवाळमध्ये पायी दिंडी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रीत,
शंभर वर्षांपूर्वीच्या शाहू कालीन शाळा दुरुस्त करताना प्रशासनाची कसोटी
निसर्गमित्र संस्थेच्यावतीनं वाघाटी आणि पेंढर वनस्पती संवर्धन मोहीम राबवली जाणार,
दोन्ही भाज्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन आहारात वापर वाढवण्याची गरज
इचलकरंजीत ई बस सेवेसाठी गाळेधारकांनी सहकार्य करावं,
महापौर उदय धातुंडे यांचं आवाहनकोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गर्भवती मातांना मोफत नाश्ता-जेवण पुरवणं बंद झाल्यानं संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी, शुक्रवारच्या स्थायी सभेत नगरसेवकांची मागणी
विठू माऊलीच्या जयघोषात कणेरी इथं पार पडला दिंडी, पालखी आणि रिंगण सोहळा, भाविकांचा उदंड उत्साह
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापुरातील प्रथम फौंडेशन तर्फे युवा उद्योजक, व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थींचा झाला सत्कार
आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी, अंबाबाई देवीचीसुद्धा विठ्ठल रूपात पूजा
लग्नाच्या २४ वर्षांनंतर पत्की हॉस्पिटलमध्ये अपत्य प्राप्ती झालेल्या दाम्पत्याचा झाला विशेष सत्कार, जागतिक आयव्हीएफ दिनाची दिली माहिती
हेरवाडमध्ये सर्वपक्षीय एकजूट, आरोपी शिक्षकाच्या अटकेसाठी निर्णायक लढा
कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्यावतीनं पंढरीच्या वारकऱ्यांसाठी दिली वैद्यकीय सेवा, चार दिवसात हजारो भाविकांना झाला लाभ
प्रति पंढरपूर नंदवाळकडं जाणाऱ्या वारकरी दिंडीचा खंडोबा तालीम इथं उभा, तर पुईखडी इथल्या माळावर पार पडला रिंगण सोहळा, भाविक आणि वारकरी भक्तीरसात झाले चिंब
उद्धव ठाकरे यांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा राजकीय हेतूनं, स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी निष्फळ धडपड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

टिप्पण्या

news.mangocity.org