आजची बातमी पत्र

  • दिवसभरात पावसाचा जोर ओसरला, राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ वाढ, कोल्हापुरात ३२ फूट ३ इंचावर, तर इचलकरंजीत ५८ फुटावर, पुढील दोन दिवस कोल्हापूरला यलो अलर्ट
  • लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर प्रदर्शन केल्याचे कोल्हापुरात पडसाद, भाजपनं काढला काँग्रेस कमिटीवर मोर्चा, शाहूपुरी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
  • केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला रंगकर्मींचा विरोध कायम, स्थानिक कलाकारांचे नुकसान होणार नाही याची प्रशासनानं खबरदारी घ्यावी, आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना
  • कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तांदुळवाडीतील वृद्धाचा जागीच मृत्यू
  • मतदार पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रिया सुरू, महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण, एसआयआरचे अर्ज भरण्यासाठी सामान्य नागरिक अनभिज्ञ
  • करवीर पंचायत समितीच्या मागे असलेल्या सीता कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्यानं प्रचंड दुर्गंधी, मैला वाहतोय थेट रस्त्यावर
  • हळदी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे, डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळला, पण मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहितीच नाही, पत्रकारांच्या प्रश्नांनंतर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
  • वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अल्प प्रतिसाद
  • एकटी संस्थेच्यावतीनं कोल्हापुरात पार पडली मानसिक आरोग्य हक्क परिषद, मनोरुग्णांच्या समस्यांवर विविध अंगांनी झाली चर्चा
  • विविध क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यानं केलेली प्रगती माध्यमांनी जागतिक स्तरापर्यंत पोचवावी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांचं आवाहन, पत्रसूचना कार्यालयाच्यावतीनं माध्यम परिषद संपन्न
  • अन्यायकारक ई चलनद्वारे होणारा दंड रद्द करण्याबाबत कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्यावतीनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलं निवेदन
  • रिक्षाचालक महादेव बोडके खून प्रकरणाच्या पोलिस तपासाला वेग, उंचगाव पुलाजवळ सापडली रिक्षा
  • गायन समाज देवल क्लब आयोजित अभंगवाणी कार्यक्रमातून कोल्हापूरचे रसिक तृप्त, आषाढी एकादशीनिमित्त झाला भक्ती गीतांचा अभिषेक
  • कणेरीमधील श्री सिद्धगिरी संस्थान मठाच्या श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचं झालं भूमीपूजन
  • शस्त्र घेऊन दहशत माजवत महिन्याला ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या इचलकरंजीतील ९ जणांना अटक, फाळकुटदादांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चाकडून तीव्र निषेध
  • स्वर्गीय अभिनेते राजेश खन्ना यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त हृदयस्पर्श संस्थेकडून झाली संगीत मैफिल, वादक महिला कलाकार आणि सरस गायकांच्या गाण्यातून मैफिल बनली संस्मरणीय
  • महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्यावतीनं देण्यात आलं ३४ लाख रुपयांचं अत्याधुनिक कलर डॉपलर सोनाग्राफी मशीन, रुग्णांची मोठी सोय
  • अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गाजली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला जाब

टिप्पण्या

news.mangocity.org