अहेरी वनाधिकाऱ्यांची अवैध उत्खननाविरोधात धडक कारवाई
अहेरी वनाधिकाऱ्यांची अवैध उत्खननाविरोधात धडक कारवाई
By:
दिपक chunarkar
July 20,2026
3 ट्रॅक्टर जप्त, जेसीपी चा शोध सुरू
.(Illegal mineral mining) : काल दुपारच्या वेळी उपवनसंरक्षक आलापल्ली चंद्रपूर रोड जवळील नागेपल्लीच्या नाल्याजवळून जात असताना अवैध उत्खनन चालू असल्याचे दिसल्याने त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यानुसार ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून टेकूलगुडा, महागाव व आलापल्ली येथील तीन ट्रॅक्टरचा शोध लावून आज अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करण्यात आले. आलापल्ली येथील जेसीपी दुसऱ्या कामावर गेल्याची माहिती असल्याने ती जमा करण्याच्या शोधात वन कर्मचारी असल्याची माहिती तपास अधिकारी राऊंड ऑफिसर संतोष पडालवार यांनी दिली. अहेरी वनपरिक्षेत्राच्या कंपार्टमेंट नंबर 28 मधील सदर घटना आहे.
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 अंतर्गत तहसीलदारांनी आलापल्ली निवासी सय्यद जाकीर हुसेन गुलाम सय्यद यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क च्या कटिंग मधून निर्माण झालेल्या गौण खनिज वाहतूक करून नागेपल्ली येथील 15 /32 क्षेत्र 9.26.70 आर हेक्टर आर मध्ये जमा करून ठेवण्याबाबत सध्या वीस ब्रासची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सदर काम करावयाचे आहे असे सांगून रावजी इस्टाम टेकुलगुडा, तुकाराम नेताम महागाव व स्वप्नील मडावी आलापल्ली यांच्या ट्रॅक्टरने वाहतूक करण्यास सांगितले. मात्र परवाना एका ठिकाणाचा व गौण खनिज उत्खनन वनपरिक्षेत्रात करीत होते अशी माहिती तपास अधिकारी संतोष पडलवार यांनी दिली.
दरम्यान उपवनसंरक्षक दिपाली तलमले काल दुपारच्या काळात दौरा करीत असताना सदर बाब दिसल्याने ट्रॅक्टर मधील आरोपी ट्रॅक्टरसह पसार झाले. मात्र त्याचे चित्रीकरण झाले होते.त्यामुळे त्या आधारे वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रात्र पासून ट्रॅक्टरचा शोध मोहीम घेऊन सध्या तीन ट्रॅक्टर विभागात जप्त करण्यात आले आहेत. खोदकाम करणारी जेसीपी दुसऱ्या कामावर गेल्याने तिची जप्ती उद्या होणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली. गुन्हाची नोंद नियत वनरक्षक राकेश नागुलवार यांनी वन कार्यालयात दिली.
अशा प्रकारे गौण खनिज परवाना धारकाने गोन खनिज वाहतुकीची परवानगी आहे म्हणून ट्रॅक्टर मालकांची दिशाभूल करून वेगळ्याच ठिकाणावरून उत्खनन केल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त झाले आहेत. उपवनसंरक्षक दिपाली तलमले,सहाय्यक उपवनसंरक्षक शिशुपाल पवार व अहेरी वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल संतोष पडालवार जेसीपीचा शोध व इतर तपास वन कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने करीत आहेत. गुन्ह्यातील नियम कलम यांची नोंद जेसीपी जमा केल्यानंतर करणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली. मात्र ट्रॅक्टर जमा केल्यावर पंचनाम्यानुसार त्यावरील कलम, नियम निश्चित व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा