मुख्य सामग्रीवर वगळा
आजचे बातमीपत्र
- पावसाचे आगमन: अखेर पावसाने जोर धरला असून कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. १ जुलैपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
- शिक्षण क्षेत्रातील निर्णय: खाजगी शिकवणी आणि बालवाडी चालवणाऱ्या संस्थांसाठी लवकरच नवीन कायदा येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणाऱ्या जिल्ह्यांना १ कोटी ते ५ कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
- कोल्हापूर महानगरपालिका: घरफाळा सवलत योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, महानगरपालिकेच्या तिजोरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० कोटी रुपयांची भर पडली आहे.
- पोलिस कारवाई: लोकांचे गहाळ झालेले १३ लाख ८७ हजारांचे सुमारे १०० मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत..
- राजकीय मागणी: विनापरवाना खाजगी कोचिंग क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात आली आहे.
- टीईटी परीक्षा (TET): पुढील वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तसेच पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- गुन्हेगारी: इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या दोन गुन्हेगारांची पोलिसांनी तपासणीसाठी धिंड काढली.
- भक्ती आणि सेवा: कोल्हापुरातील भक्तांच्या वतीने ३०० महिला भाविकांसाठी शेगाव आणि अष्टविनायक दर्शनाचे आयोजन करण्यात आले असून बसेस रवाना झाल्या आहेत.
- पुरस्कार वितरण: शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक आणि कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
- केशवराव भोसले नाट्यगृह विवाद: नाट्यगृहाच्या नूतनीकरणामध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. नूतनीकरणादरम्यान ब्रिटीशकालीन लोखंडी गर्डर भंगारात काढल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- ब्राह्मण गोलमेज परिषद: ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ४ जुलै रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- वैद्यकीय यश: यकृताला गंभीर दुखापत झालेल्या एका १२ वर्षांच्या मुलीला 'ॲस्टर आधार हॉस्पिटल'मुळे जीवदान मिळाले असून तिला नवजीवन लाभले आहे.
- पावसाचा अंदाज: इचलकरंजीत कर्नाटकच्या बेंदूर सणाचे औचित्य साधून 'धाकल्या पाटलांच्या' बैलांनी तोडलेल्या वेगावरून यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- अंमली पदार्थ विरोधी जनजागृती: कोल्हापूर पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला सुरुवात झाली आहे. राजारामपुरी पोलिसांच्या पुढाकाराने विविध शाळांच्या सहभागातून मोठी जनजागृती रॅली काढण्यात आली.
- गोकुळ निवडणूक: राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने गोकुळ निवडणुकीसाठी १ हजार ८५१ दूध संस्था प्रतिनिधींचे ठराव दाखल केल्याचा दावा केला आहे.
- नाट्यगृह लोकार्पण: केशवराव भोसले नाट्यगृहाचे ९ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
- आंतरराज्य गुन्हेगाराला अटक: दुचाकींच्या डिकीतील रोख रक्कम चोरणाऱ्या संतोष कट्टीमणी या आंतरराज्य गुन्हेगाराला जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
- मोटार चोरीचा तपास: भुदरगड तालुक्यातील पंडितराव माईन्स कंपनीची ८ लाखांची मोटार चोरीला गेल्याप्रकरणी एका संशयिताला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
- अनुदान आंदोलन: विना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनाला 'शैक्षणिक व्यासपीठाने' आपला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा