मुख्य सामग्रीवर वगळा
आजची बातमी पत्र
- लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अवघा जिल्हा शाहूमय, कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राजर्षि शाहू महाराजांच्या भव्य प्रतिमेला विविध मान्यवरांकडून अभिवादन.
- दसऱ्या चौकात राजर्षि शाहू महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांकडून अभिवादन, सामाजिक न्याय दिनी समता दिंडी उत्साहात संपन्न.
- कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गॅस वितरण पाईपलाईनला गळती, आगीच्या भडकल्या ज्वाला, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे टळली मोठी दुर्घटना.
- न्यायालय, प्रशासन, माध्यम आणि पोलीस दलाबाबत बोलताना लोकप्रतिनिधींनी विचारपूर्वक वक्तव्य करणे गरजेचे, आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच शिवसेनेत इनकमिंग, नामदार प्रकाश आबिटकर यांचा दावा.
- हवामान खात्याला चकवा देत आणखी एक दिवस कोरडाच, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी फक्त ०.५ मिलीमीटर पावसाची नोंद, जून महिना संपत आला तरी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी हवालदिल.
- राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांकडून अभिवादन, विविध उपक्रमांचे आयोजन.
- नुतनीकरण केलेल्या राजर्षि छत्रपती शाहू स्मारक भवनचे झाले लोकार्पण, आरामदायी आसन व्यवस्थेसह अत्याधुनिक ध्वनी प्रकाश योजना आणि अन्य सुविधांचा समावेश.
- इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे ताराबाई पार्कमधील नक्षत्र वन परिसरात बसवलेल्या सौरदिव्यांचा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ.
- यड्रावमधील उद्योजकाची सव्वाकोटीची फसवणूक केल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार वैशाली मांजरेकरला अटक.
- सीपीआर मधून दिव्यांग दाखले वेळेवर मिळत नसल्यानं अनेक लाभार्थी शासकीय सवलतींपासून राहतात वंचित, लालफितीचा संथ कारभार सुधारण्याची गरज.
- बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनलच्यावतीनं २७ जून रोजी कोल्हापुरात उद्योजक परिषदेचं आयोजन.
- जगभरात शांतता नांदावी, देशात चांगला पाऊस व्हावा, यासाठी ब्राम्हण सभा करवीर मंगलधामच्यावतीनं झाला श्रीराम यज्ञ आणि रामपंचायत हवन.
- पंचगंगा प्रदूषणावरून आंदोलन अंकुश आणि इचलकरंजीतील प्रोसेस युनिट धारकांसह कामगारांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार वाद.
- इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश जर्मनी, असिफ मुजावर २ वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा