आजच्या ठळक घडामोडी
- मुरगुड-निपाणी रोडवर भीषण अपघात, भरधाव कारनं पाठीमागून ठोकरल्यानं पादचाऱ्यासह कार चालकाचा जागीच मृत्यू, मयत खडकेवाडा आणि निपाणीतील.
- गोकुळमधील ६४४ दूध संस्था अवसायनात काढण्याच्या सहाय्यक दुग्ध निबंधकांच्या निर्णयाला सर्किट बेंचची स्थगिती.
- पुढील चार दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट, घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज.
- पावसाळी अधिवेशनात परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस.टी. कर्मचाऱ्यांना महागाई, घरभाडे, भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर.
- सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स ८९३.३९, तर निफ्टी २७८.८० च्या अंकांनी घसरला, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसला सुमारे ४.५७ लाख कोटी रुपयांचा फटका.
- ग्रामीण भागातील नागरिकांकडं अनधिकृत पाणी कनेक्शन आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारावा, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश.
- श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत होणाऱ्या भूसंपादन आणि विविध घटकांच्या पुनर्वसनाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असणार अध्यक्ष.
- कोल्हापुरातील पाण्याच्या खजिन्याजवळ पाण्याची गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातून हजारो लिटर पाणी चाललंय वाहून, आजूबाजूच्या घरात शिरलं पाणी.
- भुदरगड तालुक्यातील मोरेवाडी गावच्या जॅकवेलमध्ये मृत माशांचा खच, बेकायदा मासेमारीचा संशय, दूषित पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका.
- रिक्षाचालक साद पठाण याच्या खून प्रकरणी संशयित सचिन आगलावे याची राजारामपुरी पोलिसांनी काढली धिंड.
- ध्रुव तारा फाऊंडेशनच्यावतीनं ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांचा खाशाबा जाधव पुरस्कारानं गौरव. खाशाबांना पद्मविभूषण तर बंडा पाटील यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळण्याची मागणी.
- कोल्हापुरात साकारला दक्षिण भारतातील पहिला ५ फुटी पितळी ताजिया अर्थात ताबूत; करवीरच्या कारागिरांची आणखी एक कलाकारी.
- श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रथम प्राधान्य; देवस्थान समितीच्या नूतन सचिव वर्षा साळुंखे-परिट यांची माहिती.
- इचलकरंजीत वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सर्जेराव कुंभार यास अटक.
- इचलकरंजीच्या सु ळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.
- करवीर तालुक्यातील शिये इथं भागीरथी महिला संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद; महिलांना मिळालं रोजगारपूरक प्रशिक्षण.
- झोन आणि आरक्षण बदल करण्यासंदर्भातील निर्णयाचे अधिकार महापालिका सभागृहाला; तावडे हॉटेल परिसरातील बांधकाम प्रश्नी २५ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत महापालिकेनं म्हणणं मांडावं, शासनाचे निर्देश.
- कोल्हापुरातील सदर बाजार इथल्या अल्पवयीन चोरट्याला शाहूपुरी पोलिसांकडून अटक; १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी जप्त.
हसुर चंपू तालुका गडहिंग्लज या गावांमध्ये जुने बिरदेव मंदिर च्या गाभाऱ्यांमध्ये रिपेरी चालू असताना पुरातन मूर्ती मिळाली आहे या मूर्तीची पाहणी करण्यासाठी निडसोशी येथील महास्वामीजी आज गावामध्ये आले होते त्यांनी अशी मूर्ती आत्तापर्यंत त्यांनी पाहिली व दिसली नाही असे त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितले व त्यांनी पंच कमिटीला पुरातन विभागा कडे याची चौकशी करावी असा सल्ला देण्यात आला आहे तसेच या कार्यक्रमावेळी पंच मंडळी यांच्याकडून स्वामीजींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा