मुख्य सामग्रीवर वगळा
बातम्या आजच्या
- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शनिवारपासून तीन दिवसांसाठी शेतीसाठी पाणी उपसा सुरू करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा.
- बोगस बिगर शेती आणि बनावट ले आऊटनं नोंदणी केलेल्या खरेदी दस्तांची होणार चौकशी, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
- भरधाव डंपरच्या धडकेत डोणोलीतील वंदना पाटील या महिलेचा मृत्यू, पडवळवाडी इथली घटना, वाहनासह चालक पसार.
- चंदगड तालुक्यातील आंबेवाडी गावाजवळ भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, कर्नाटकातील २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू.
- घोडागाडी उलटल्याने गंभीर जखमी होऊन कसबा सांगावच्या ३६ वर्षीय तरूणाचा मृत्यू, कसबा सांगाव ते हुपरी रोडवर झाला अपघात.
- गगनबावडा तहसील कार्यालयाजवळ भीषण अपघात, सांगली इथल्या ४२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, गव्या रेड्याच्या धडकेने अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
- केंद्र सरकारची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना देशातील युवकांच्या जीवनात क्रांती करेल, शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास.
- कोल्हापूर शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक संपन्न, पाणी पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सुचना.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इचलकरंजी दौऱ्याच्या जय्यत तयारीची राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली पाहणी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा