मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या ठळक घडामोडी
- कोल्हापूर पाणीपुरवठा: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पुरेशी पाणी पातळी झाल्याने कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेने २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
- प्रशासनाचा गलथान कारभार: एकीकडे नागरिक पाण्यासाठी धावपळ करत असताना, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी वाया गेले आहे.
- अमित शाह यांचा दौरा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस मैदानावर आयोजित कार्यक्रमाची महायुतीच्या नेत्यांनी पाहणी केली आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
- इचलकरंजी अपघात: इचलकरंजी येथील मुख्य बसस्थानकात भरधाव वाहनाच्या धडकेत कुंभोजच्या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
- मान्सूनचा अंदाज: हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार, रविवार २१ जून रोजी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे.
- इचलकरंजी पाणी प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
- राडा आणि कारवाई: गांजा आणि दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी चोप दिला. गांधीनगर पोलिसांनी त्यांची सुटका करून दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.
- महापालिकेचा कडक निर्णय: नळाला मोटर लावून पाणी भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह मोटर जप्त करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
- रेन हार्वेस्टिंग: पाण्याची परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी सर्वांना 'रेन हार्वेस्टिंग' सिस्टीम बंधनकारक करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये करण्यात आली आहे.
- यशस्वी शस्त्रक्रिया: २८ वर्षीय महिलेच्या जन्मजात हृदयरोगवर सीपीआरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
- टीईटी पेपर फुटी प्रकरणी फेर तपासाबाबत ठाकरे गट सेनेच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांना निवेदन.
- गूढ आणि रहस्यमय कलाकृती असलेला घबाडकुंड हा नवा मराठी चित्रपट १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जून रोजी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहनाचे वितरण होणार.
- कागल शहरात पाणीटंचाईची चाहूल, शहराच्या पाणीपुरवठ्यात १० मिनिटांची कपात करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय; नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन.
- घराशेजारी खेळताना विजेच्या जोरदार धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या घटनेने परिसरात हळहळ.
- पाणी उपसाबंदीच्या विरोधात शेतकरी आक्रमक, सिंचन भवनसमोर आंदोलन, उपसाबंदी मागे घेण्याची मागणी.
- कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील खूनप्रकरणी तिघांना अटक, जुन्या वादातून परप्रांतीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघड.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर महापालिकेकडून विविध सुविधा आणि स्वच्छतेच्या कामाची तयारी.
- उसाची एफआरपी ४ हजार ५०० रुपये करावी या आणि अन्य मागण्यांसाठी २१ जूनपासून करवीर तालुक्यातील चुये इथे आमरण उपोषण करणार, माणिक पाटील-चुयेकर यांची माहिती.
- कोल्हापुरात राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदेद्वारे विविध राज्यातील शाहू विषयक कार्याचे होणार मंथन, २१ जूनला शाहू स्मारक भवनमध्ये होणार परिषद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा