​"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ऐतिहासिक आणि लोककल्याणकारी; सातारा जिल्ह्याचाही झाला कायापालट!" — ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासावर सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांनी पत्रकार परिषदेत मांडला विकासाचा आलेख!
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी, ऐतिहासिक आणि लोककल्याणकारी कार्यकाळाचा आढावा घेताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे," असे प्रतिपादन छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड मध्ये भव्य पत्रकार परिषदेत केले. या परिषदेला देशाचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज , भाजपा जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले,मनोजदादा घोरपडे, भरत पाटील राज्याचे प्रतिनिधी विक्रमजी पावसकर,सुनिल काटकर, रामकृष्ण वेताळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
​पत्रकार परिषदेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र, राज्य आणि सातारा जिल्ह्यासाठी झालेल्या कामांचा घेतलेला सविस्तर आढावा खालीलप्रमाणे:
​१. थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि पारदर्शकता
​शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारच्या काळात 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे केवळ एक ब्रीदवाक्य राहिले नसून ते जनआंदोलन बनले आहे.
​"सरकारने कल्याणकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे मध्यस्थांची लूट आणि भ्रष्टाचार पूर्णपणे बंद झाला."
​या प्रणालीमुळे यंत्रणेतील लाखो बनावट लाभार्थी दूर झाले असून, देशाचे ४.२१ लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
​२. देशव्यापी जनकल्याणकारी योजनांचा आलेख
​गेल्या १२ वर्षांत राबवण्यात आलेल्या प्रमुख योजनांची आकडेवारी मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले:
​दारिद्र्य निर्मूलन व जनधन: मोदीजींच्या धोरणांमुळे १२ वर्षांत २५ कोटींपेक्षा जास्त लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. ५८ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली, ज्यात ३२ कोटी खाती महिलांची आहेत.
​अन्न व आरोग्य सुरक्षा: कोरोनाच्या कठीण काळात ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन दिले गेले. गरिबांच्या मोफत उपचारांसाठी ७ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड जारी झाले, तर 'मिशन इंद्रधनुष' अंतर्गत ५४ कोटी मुलांचे मोफत लसीकरण झाले.
​आवास, उज्ज्वला व जलजीवन: ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली. ११ कोटी भगिनींना मोफत गॅस कनेक्शन देऊन धुरापासून मुक्ती दिली. तसेच, १६ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवले आणि १२ कोटींहून अधिक शौचालये बांधली.
​कृषी आणि रोजगार कल्याण: 'पीएम किसान सन्मान निधी'तून ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ४.६७ लाख कोटी रुपये थेट जमा झाले. 'मुद्रा योजने'तून ५७ कोटींचे कर्ज वाटप झाले, तर 'लखपती दीदी योजने'तून ३ कोटी महिलांना लाभ मिळाला. मध्यमवर्गीयांना दिलासा देत कर सवलतीची मर्यादा १२.७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली.
​३. पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्रांती
​पायाभूत सुविधांबद्दल बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की:
​"गेल्या १२ वर्षांत ४ लाख किमीचे पक्के ग्रामीण रस्ते बांधले गेले, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासाचा वेळ ८ तासांवरून ३ तासांवर आला आहे."
​राष्ट्रीय महामार्ग १.४६ लाख किमी झाले असून आज रोज ३४ किमीहून अधिक नवीन महामार्ग बांधले जात आहेत. चिनाब पूल, नवीन पंबन पूल आणि 'अटल टनेल'मुळे सीमेवरील लष्कराची रसद वेगवान झाली आहे.
​रेल्वेचे ९९.६% विद्युतीकरण पूर्ण झाले असून १६४ हून अधिक 'वंदे भारत एक्सप्रेस' धावत आहेत. तसेच, देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून १६४ च्या पार गेली आहे.
​४. सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्र अभिमान
​शिवेंद्रसिंहराजे यांनी मोदी सरकारच्या सांस्कृतिक कार्याचा गौरव करताना सांगितले की:
​गुलामीची मानसिकता मोडीत काढत 'राजपथ'चे नाव 'कर्तव्यपथ' केले आणि 'रेस कोर्स रोड'चे नाव 'लोक कल्याण मार्ग' केले.
​"सर्वात महत्त्वाचे म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक यादीत आणून शिवरायांचे स्वराज्य जगाच्या नकाशावर नेण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे."
​५. महाराष्ट्रासाठी मिळालेले ऐतिहासिक योगदान
​महाराष्ट्राच्या विकासाचा संदर्भ देत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले:
​'समृद्धी महामार्ग', 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे' आणि समुद्रावरील ऐतिहासिक 'अटल सेतू' जनतेच्या सेवेत रुजू झाला आहे. महाराष्ट्राला १५,००० कोटींपेक्षा जास्त वार्षिक रेल्वे निधी मिळत आहे.
​पालघरमधील ७६,००० कोटींच्या 'वाढवण बंदर' या मेगा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, जे जगातील पहिल्या १० मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवून रोजगार आणेल. छत्रपती संभाजीनगर जवळील 'ऑरिक' हे देशातील सर्वात यशस्वी स्मार्ट औद्योगिक शहर बनले आहे.
​६. सातारा जिल्ह्याचा कायापालट
​आपल्या सातारा जिल्ह्याबद्दल बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिमानाने सांगितले की:
​"सातारकरांचे प्रलंबित स्वप्न असलेले सातारा मेडिकल कॉलेज आता अंतिम टप्प्यात आले आहे."
​सातारा सैनिक स्कूलच्या नूतनीकरणाचा दुसरा टप्पा वेगाने सुरू आहे.
​नितीन गडकरी आणि मोदीजींच्या माध्यमातून महामार्गांचे रुंदीकरण झाले असून, कराड येथील राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाणपूल लवकरच सुरू होत आहे. खंडाळा घाटातील एक टनेल खुला झाला असून दुसराही लवकरच खुला होईल.
​अजिंक्यतारा किल्ला आणि सातारा येथील राणीसाहेब व छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी भरीव निधी आणला आहे. साताऱ्याच्या आयटी पार्कला गती देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.
​निष्कर्ष आणि प्रार्थना:
​पत्रकार परिषदेचा समारोप करताना छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "गेल्या १२ वर्षांत देश आणि महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचे अभूतपूर्व काम मोदी सरकारने केले आहे. एक सातारचा नागरिक आणि शिवभक्त म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही विकास घोडदौड अशीच पुढे चालू राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो."

टिप्पण्या

news.mangocity.org