मुख्य सामग्रीवर वगळा
आज चे बातमी पत्र
- एकाही रुग्णाला खाजगी रुग्णालयात जायला लागणार नाही, अशा सुविधा आता सीपीआरमध्ये उपलब्ध, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा, सीपीआरमधील नव्या सेवासुविधांचं झालं लोकार्पण
- नगरविकास विभागाचे अपर सचिव डॉ. गोविंदराज यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविषयी खरं बोलून शासनाला उघडं पाडलं, हद्दवाढ कृती समितीचा टोला
- कचरा जळल्यानं कोल्हापूर विमानतळाच्या आकाशात काळयाकुट्ट धुरांचे लोट, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, वारंवार चर्चा होऊनही परिस्थितीत सुधारणा शून्य
- आयटी पार्कसाठी एमआयडीसीकडं जागा हस्तांतरीत होताच, कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या हालचाली बनल्या वेगवान, पहिल्या टप्प्यात ८० आयटी कंपन्यांनी गुंतवणुकीची दर्शवली तयारी
- सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स १ हजार ९२ अंकांनी कोसळून ७४ हजार ७७५ अंकावर, तर ३५९ अंकांनी घसरून निफ्टी २३ हजार ५४७ वर, गुंतवणूकदारांचं सुमारे ५.१७ लाख कोटी रुपयांचं नुकसान
- हलाल प्रमाणपत्राचा मुद्दा गोकुळच्या राजकारणात प्रचंड वादग्रस्त, नामदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश बेलवाडे यांच्या भूमिकेमुळं जिल्ह्यात चर्चेला ऊत
- किसका फाट्या-किसका तुट्या... कोल्हापूर महापालिकेच्या ताफ्यात आलेली काही नवी वाहनं सुद्धा गंजत पडल्यानं महापालिकेचा निष्काळजीपणा उघड
- गोकुळचं हलाल प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करण्याची मागणी करत कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शनं
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया स्थगित करण्याची खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाची प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडं मागणी
- ११४ कोटी रुपयांचा गल्ला जमवत राजा शिवाजी चित्रपट ठरला मराठीतला आणखी एक यशस्वी चित्रपट
- चालुक्यज स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने झालेल्या स्केटिंग स्पर्धेत जे जे रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलं घवघवीत यश.
- शेती मशागतीची कामं सुरू असल्यानं, शेतकऱ्यांना २४ तास अखंड वीज पुरवठा व्हावा, जयशिवराय किसान संघटनेची मागणी.
- पदोन्नती आणि नवीन नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मंजुरी देण्याची नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडं कोल्हापुरातील विविध राजकीय पक्षांची मागणी.
- इचलकरंजीत कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला पुन्हा गळती, पाणी टंचाई असताना गळतीतून वाया जाणाऱ्या पाण्याचं बिलिंग अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी.
- क्रिकेट बेटींग प्रकरणी १०४ संगणकांसह तब्बल ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, इचलकरंजीतील बेटींग प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत.
- राज्यस्तरीय एनसीसी कॅडेट नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूर ग्रुपने पटकावलं विजेतेपद, ४० कॅडेटची महाराष्ट्र संघात निवड.
- कोल्हापूर महापालिकेच्या शहरातील जागा आणि वाहनतळासाठी येत्या दोन दिवसात निघणार निविदा, पारदर्शी प्रक्रियेची अपेक्षा.
- अकरावी ऑनलाईन पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफमध्ये नगण्य घसरण.
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनमोल योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १५२ वी जयंती कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी.
- शाहू मार्केट यार्ड इथल्या कोहिनूर ट्रेडर्सच्या गोदामातून भरदिवसा तांदळाची पोती चोरणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या राजकारणात आता महामंडळ बचाव अपक्ष संघाची एंट्री, महामंडळाच्या सभासदांना न्याय देण्याची भूमिका असल्याचा दावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा