मुख्य सामग्रीवर वगळा
आजचे बातमी पत्र
- गोकुळ निवडणूक: महायुतीकडून 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' जाहीर; ठरावाच्या प्रमाणात जागा वाटप होणार.
- रेल्वे स्थानक सुरक्षा: कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर परप्रांतीय तरुणांचे लोंढे; सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षेसाठी पोलिसांकडून चौकशीची गरज.
- घुसखोरीची शंका: युपी, बिहारी आणि बंगाली तरुणांच्या घोळक्यातून बांगलादेशी घुसखोर कोल्हापुरात येत असल्याची शंका; रेल्वे व कोल्हापूर पोलिसांचे दुर्लक्ष.
- मराठा आरक्षण: कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना 'कोल्हापूर गॅझेट'चा प्राधान्याने विचार व्हावा; सकल मराठा समाजाची मागणी.
- घरफोडी/चोरी: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारे अक्षय कोरवी आणि विजय सुर्वेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २४ तासांत अटक.
- रामदास आठवले यांची भूमिका: मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही.
- महापालिका दुकाने: महानगरपालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांच्या भाडेवाढीबाबत दोन महिन्यात तोडगा काढण्याची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची ग्वाही.
- महागाईचा फटका: खाद्यतेलाचे दर लिटरमागे ५ रुपयांनी वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले.
- भाजीपाला दर: कडक ऊन आणि इंधन दरवाढीमुळे पालेभाज्या व फळभाज्या महागल्या; टोमॅटोचा दर ५० रुपयांवर.
- कारचालकास अटक: मुंबई-कोल्हापूर मार्गावर खाजगी कारमधून प्रवाशांचे ८ लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या कारचालक मोहन आडागळेला शाहूपुरी पोलिसांनी ठाण्यातून केली अटक.
- इचलकरंजीतील प्रोसेसचं रासायनिक विषारी पाणी पंचगंगा नदी मध्ये सोडणं बंद करा अन्यथा ३ जून रोजी कुरुंदवाडहून इचलकरंजीला जाणारा पाणी पुरवठा रोखणार, आंदोलन अंकुशची माहिती.
- जागेच्या वादातून फिल्मी स्टाईल बेदम मारहाण, ८ महिन्यांच्या गरोदर महिलेसह मुलीला मारहाण करणाऱ्यांवर तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ.
- वीज कपात केल्यानं शेतकऱ्यांचा इचलकरंजीतील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव, सलग आठ तास वीज पुरवठ्याची केली मागणी.
- नागरिकांची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची अपेक्षा.
- राष्ट्रभक्तीला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्यावर आणलं, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती.
- थेट पाईपलाईन योजनेसाठी बिद्री ते काळम्मावाडीपर्यंत भुमिगत विद्युत केबलसाठी १९ कोटी ३९ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडं पाठवण्यास स्थायी समितीची मंजुरी.
- कणेरीवाडीत दोन गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा, १ लाख ५५ हजारांचं साहित्य नष्ट.
- रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि वस्त्रम गारमेंटच्यावतीनं महिलांना फॅशन डिझाईनिंग आणि शिवण कामाचं दिलं प्रशिक्षण.
- कोल्हापुरातील ताराराणी चौकात पोलीस स्टेशन समोरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटनं लागली आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा