आजच्या बातम्या

  • व्यावसायिक सिलिंडर दरात सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाल्यानं हॉटेल-रेस्टॉरंट-स्विटमार्ट आणि उद्योजकांना फटका, खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता.
  • शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच खरा अंत्योदयाचा मार्ग, खासदार धनंजय महाडीक यांच इचलकरंजीत प्रतिपादन.
  • गेल्या ३ दिवसात साडेतीन लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतलं श्री अंबाबाई देवीचं दर्शन, सलग सुट्टीचा साधला त्रिवेणी संगम, भाविक-पर्यटकांच्या गर्दीनं कोल्हापूर गजबजलं.
  • कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाला समस्यांचा विळखा कायम, १५ वर्षांपासून रखडलेलं क्रीडा संकुल कधी पूर्ण होणार, खेळाडूना प्रतिक्षाच.
  • नकारात्मकता आणि ताणतणाव दूर करून दीर्घायुषी बनवणारं हास्य म्हणजे मानवाला लाभलेली दैवी देणगीच... जागतिक हास्य दिन विशेष...
  • पूर्व वैमनस्यातून राधानगरी तालुक्यातील असंडोलीपैकी फालेवाडा इथं सूरज फाले या तरुणाचा निर्घृण खून, संशयित तिघेजण स्वतःहून पोलिसात हजर, ५ दिवसांची पोलीस कोठडी.
  • तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केल्याप्रकरणी बिल्डर शक्ती भोसलेला राजारामपुरी पोलिसांकडून अटक, न्यायालयानं सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी.
  • शब्दां वाचून कळले, शब्दांच्या पलीकडले, शंभर टक्के कर्णबधिर युवक-युवतीचा कोल्हापुरात झाला अनोखा शाही विवाह सोहळा, प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मिळवलं कन्यादानाचं पुण्य.
  • इचलकरंजीत खो-खो स्पर्धेला प्रारंभ, तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत १० संघ सहभागी.
  • पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांची सुरक्षा धोक्यात, तीन महिन्यात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी; शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा.
  • स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांची धर्मचिकित्सा मानव मुक्तीसाठी उपयुक्त, डॉ. सोमनाथ कदम यांचं प्रतिपादन.
  • पतंजली योग समितीचे शहर प्रभारी विलास निकम यांच्यावतीनं पाण्यातील योग प्रात्यक्षिक स्पर्धा संपन्न.
  • जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वबोधाचा अभाव असून स्व ची जागृती केल्याशिवाय देशाचा विकास किंवा चांगला काळ येणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांचं मत.
  • इचलकरंजी इथं गांजा विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक, सव्वा दोन लाखांचा ४ किलो दीडशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त.
  • व्यायामपटूंना धष्टपुष्ट तब्येतीसाठी मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा सदृश्य अंमली पदार्थ देणाऱ्या विनायक माने आणि स्वप्निल माने यांना अटक, ५० हजारांचं साहित्य जप्त.
  • कायद्याचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांची इचलकरंजीत माहिती.
  • कोल्हापुरातील प्रयोगशिल दिग्दर्शक मुकुंद खुपेरकर यांनी गरीब मुलाच्या शाळकरी प्रेमाच्या कथेवर आधारित बनवलेला 'सहल' हा नवा चित्रपट लवकरच राज्यभर होणार प्रदर्शित.
  • टिप्पण्या

    news.mangocity.org