आजच्या विशेष घडामोडी

  • कोल्हापुरातील शुक्रवार पेठ इथल्या जैन मठातील भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर १९ एप्रिल रोजी होणार ६५ वा महामस्तकाभिषेक सोहळा
  • आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा बदलणाऱ्या एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तक मंडळावर कारवाई करावी, मराठा महासंघाची मागणी
  • स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा गेला तर कडक कारवाई होणार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचा इशारा
  • राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला वाठार आणि पेठवडगाव या दोन्ही बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा, नव्या सुविधा आणि स्वच्छता टिकवण्याची जबाबदारी महामंडळ आणि प्रवाशांची
  • इचलकरंजीतील पंचगंगा नदीमधील जलपर्णी हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात, मात्र अजूनही वाहत्या पाण्यातून जलपर्णी येत असल्यानं आणखी काही दिवस मोहीम सुरू ठेवण्याची गरज
  • प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड
  • कोल्हापूर विभागाला नव्या १२० बसेस दिल्या जातील, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची जयसिंगपूरमध्ये घोषणा
  • कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानाजवळ झाला अपघात, दोन दुचाकींच्या धडकेत गौतम आणि सारिका गायकवाड हे दांपत्य गंभीर जखमी
  • लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
  • इचलकरंजीत महिलेच्या गळ्यातील १ तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र धुमस्टाईलनं लंपास
  • एसटी बस स्थानक पाहणी: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली. त्यांनी सुलभ शौचालय कंत्राटदार आणि एसटी कँटीन चालकाची चांगलीच कानउघडणी केली. तसेच राज्यातील सर्व स्थानकांवरील स्वच्छतागृहे १ जूनपासून मोफत करण्याची घोषणा केली.
  • कोल्हापूर महानगरपालिका: स्थायी समितीच्या सभेत जोरदार वादावादी झाली. ऐनवेळी आलेल्या विषयावरून विरोधकांनी सभात्याग केला. सभापती विशाल शिराळे यांनी विरोधकांनी एकतर्फी सभात्याग केल्याचा दावा केला, तर सत्ताधाऱ्यांनी विषय रेटून नेल्याचा आरोप काँग्रेस आघाडीने केला.
  • उष्णतेची लाट: राज्यात उष्णतेची तीव्र लाट असून उष्माघाताचा धोका आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. कोल्हापुरात दिवसभर ढगाळ पण उष्ण हवामान राहील.
  • पंचगंगा प्रदूषण: नदी प्रदूषण रोखण्यासाठी कुरुंदवाड-शिरोळसह १५ गावांनी 'बंद' पाळला. नदी बचावासाठी शिरोळमधील नागरिकांची एकजुट महत्त्वाची ठरली आहे. प्रदूषण प्रश्नी अंकुश संघटना आक्रमक झाली असून त्यांनी काळा ओढ्यावर बांध घातला आहे.
  • प्रशासकीय सूचना: केंद्र आणि राज्य शासनाचा कोल्हापूर शहरासाठीचा निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा, यासाठी आयुक्तांनी अंकुश ठेवावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली.
  • गुन्हेगारी: मोबाईल खरेदीच्या पैशावरून झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाले. सचिन सर्जेराव मुसळे (वय ३४ वर्षे) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.
  • शेअर बाजार: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्स ५०४ आणि निफ्टी १५६ अंकांनी वधारला.
  • अवनी संस्था आणि न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागातर्फे बालकांचा ज्ञान मेळावा उत्साहात पार पडला.


टिप्पण्या