आजच्या ठळक घडामोडी

  • एआयच्या क्षेत्रात दहा हजार कोटींची गुंतवणूक करून दीड लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट, हरित महाराष्ट्र योजनेतून ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
  • बाबुभाई परिख पुलाखालील रस्त्याचं काम संथ गतीने सुरू असल्यानं टेंबलाई उड्डाण पुल आणि गोकुळ हॉटेल जवळ रोजच होते वाहतूक कोंडी, महापालिकेनं परिख पुलाचं काम गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याची आवश्यकता
  • लग्नाच्या पत्रिकेवर यापुढं वधू आणि वराची जन्मतारीख छापणं बंधनकारक, बाल विवाह टाळण्यासाठी महाराष्ट्र बालहक्क आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
  • महाराष्ट्र उकाड्यानं हैराण, विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेचा कहर, राज्याच्या पाच जिल्ह्यात वळीव पावसाचा अंदाज, मात्र सर्वांनाच पावसाची आस
  • दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी किणी इथल्या पंकज घोलपला न्यायालयानं सुनावली २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी ८ वर्षात ५० आरोपींना नेलं शिक्षेपर्यंत
  • कोल्हापुरातील प्रतिभानगर इथल्या हावळ यांच्या बंगल्यात चोरी करणारी मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला राजारामपुरी पोलिसांकडून अटक, सव्वासात लाखांचे पावणेसात तोळ्यांचे दागिने हस्तगत
  • कोल्हापूर शहरातील निर्माण चौक ते जरगनगर मार्गावर झालेली अतिक्रमणं हटवून १८ मीटरचा रस्ता मोकळा करावा, मानवाधिकार कार्यकर्त्यांची मागणी
  • तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कोल्हापूर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर, आरक्षित जागा-पुररेषा-उच्च न्यायालयीन निकालाचं उल्लंघन करत केलेली बांधकामं सात दिवसात उतरवून घेण्याचे आदेश
  • हिंदू समाजातील मुलींवर अत्याचार करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या शाहीद सनदी आणि शाहरूख देसाई यांना जन्माची अद्दल घडावी, सकल हिंदू समाजाच्या तीव्र भावना
  • इचलकरंजीतील यंत्रमागधारक संघटनांकडून वहिफणी दरवाढीला स्थगिती देण्याची मागणी, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
  • जागतिक आरोग्य दिनानिमित्त ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये झाला अवयवदान जनजागृतीचा कार्यक्रम, शंभरपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी केली अवयवदाता म्हणून नोंदणी
  • कोल्हापुरातील उमा टॉकीज परिसरात १५ ते २० दिवसांपासून नळाला येतंय चक्क अळ्या आणि किटक मिश्रीत पाणी, महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष
  • शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी निमित्त २ मे पासून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम सुरू होणार
  • बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात १ मे रोजी होणार मचान निरीक्षण मोहीम
  • घरात आणि रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेनंच डॉक्टरांच्या घरातील दागिन्यांवर मारला डल्ला, २३ लाखाचे १३ तोळे सोने आणि दोन किलो चांदी लंपास
  • पुलाची शिरोलीतील दोन तरुणांकडून १५ तरुणींवर अत्याचार प्रकरणी नागाव आणि मौजे वडगावमध्ये कडकडीत बंद
  • पुलाची शिरोली इथल्या तरुणांकडून १५ तरुणींवर केलेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडं

टिप्पण्या