चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक, रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेलधारकांसाठी ३० एप्रिल डेडलाईन

चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक, रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेलधारकांसाठी ३० एप्रिल डेडलाईन

रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : चीज अॕनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार करीत असलेल्या रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांना चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वरती दि. 30 एप्रिल 2026 पर्यंत तसा स्पष्ट उल्लेख नमूद करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन (म.रा.) विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांनी निर्देश दिले आहेत.*
     दिनांक 1 मे 2026 नंतर ज्या आस्थापनांमध्ये चीज अॕनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार केले जातात व तेथील मेन्युकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वरती चीज अॕनालॉग चा उल्लेख स्पष्टपणे केला नाही, असे निदर्शनास आल्यास संबंधित रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत अन्न व औषध प्रशासन (म.रा.), रत्नागिरी द्वारे कठोर कारवाई येईल.
            अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ (२) (e) नुसार उपभोक्त्त्यांना ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी अन्न पदार्थातील घटकपदार्थविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके (Labelling and Display Regulation) २०२० मधील Chapter ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यवसायीकाने अन्न पदार्थाची ग्राहकांना विक्री करताना, पोषण संबंधित माहिती आणि किंवा/त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
    सर्व रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते यांनी आपले चीज अॕनालॉग चे उत्पादक/पुरवठादार यांना चीज अॕनालॉगचा विक्री/पुरवठा करताना Food Safety and Standards Act, २००६ च्या कलम २३ मधील तरतुदीनुसार अन्नपदार्थाचे पॅकेजिंग व लेबलिंग भ्रामक अथवा दिशाभूल करणारे नसावे व अन्नपदार्थाचे खरे स्वरूप स्पष्टपणे नमूद करणारे असावे.
     Food Safety and Standards (Labelling and Display) Regulations, २०२० (General Labelling Requirements) नुसार विक्री बिलावर चीज अॕनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

टिप्पण्या