मांडवीतील सहाय्यक पत्तन अभियंता कार्यालयासाठी दर महिन्याला हजारो रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे, पण प्रत्यक्षात तिथे अधिकारी, कर्मचारी किती वेळ असतात? जनतेच्या पैशाची लयलूट सुरू आहे काय?

रत्नागिरीतील मांडवी येथे सहाय्यक पत्तन अभियंता, खाण व सर्वेक्षण उप विभाग, रत्नागिरी, सहाय्यक पत्तन अभियंता, पाणलोट बंधारा उपविभाग, रत्नागिरी आणि सहाय्यक पत्तन अभियंता, भगवती बंदर उपविभाग रत्नागिरी यांची कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत..त्यासाठी हजारो रुपये शासनाला भाड्याच्या रूपाने मोजावे लागत आहेत. हे पैसे जनतेने भरलेल्या टॅक्स मधून असतात. मात्र या तीनही कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किती वेळ असतात हा मोठा प्रश्न आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संगणकाचे कारण सांगून कलेक्टर ऑफिसच्या समोर जे कार्यकारी अभियंता पतन विभाग या कार्यालयात बसलेले असतात आणि तिथून ते आपले काम करतात. शिवाय मांडवी येथील कार्यालयात लाईट फॅन चालू असतात ते लाईट बिल भरावे लागतेच ना. असे असेल तर मग मांडवीच्या भाड्याच्या जागेसाठी हजारो रुपये दर महिन्याला का दिले जात आहेत. ही सगळी जनतेच्या पैशाची लयलूट सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदय तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री महोदयांनी आढावा घ्यावा अशा अपेक्षा जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या

news.mangocity.org