आजच्या घडामोडी

  • कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या एक किलोमीटर परिघातील वायू प्रदूषणाची समस्या गंभीर; सूरतच्या धर्तीवर वायू शुद्धिकरण यंत्रणा बसवण्याची मागणी.
  • पुरालेखागार कार्यालयाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून २७ लाखांचा निधी मंजूर.
  • चिल्लर पार्टीचा चौदावा वर्धापन दिन वाड्यावस्त्यांवरील मुलांसोबत साजरा; बालचित्रपटानंतर टाऊन हॉल, बाग संग्रहालय, शाहू महाराज समाधीस्थळ आणि गंगाराम कांबळे स्मारकाला भेट.
  • घरातील जुने कपडे, प्लास्टिक आणून द्या, गरजूना देऊ; 'एकटी' संस्था, कचरावेचक महिला आणि कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे 'उत्सव पुनर्चक्रीकरण भिंत' उपक्रम.
  • श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचे ८ महिन्यांचे थकीत अनुदान तातडीने लाभार्थ्यांना द्यावे; शिवसेना (ठाकरे गट) यांची मागणी.
  • श्रम आणि श्रमिकांना महत्त्व देणाऱ्या महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या शरणांची परंपरा वारकरी संप्रदाय, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांनी पुढं नेली; व्याख्याते धनाजी गुरव यांचे प्रतिपादन.
  • कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील शिवजयंती उत्सवात अडथळे आणणाऱ्या महिलेचा बंदोबस्त करावा; बुधवार पेठ आणि सिद्धार्थ नगरातील नागरिकांची पोलिसांकडे तक्रार.
  • इचलकरंजी येथे वस्त्रोद्योगातील वहिफणी कामगारांना १८ टक्के मजुरीवाढीचा निर्णय.
  • कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची पदोन्नतीवर गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून बदली, तर निलोत्पल यांची नुतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
  • इव्हेंट इंडस्ट्रीज क्रिकेट लीग स्पर्धेत साऊंड आणि लाईट असोसिएशन विजेते, तर मंडप डेकोरेटर्स संघ उपविजेता.
  • कसबा बावडा मैदान आणि वाचनालय: आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावावर महापालिका सभेत नगरसेवकांची निदर्शने; नगररचना विभाग आणि वकिलांवर शहर लुटीचा आरोप.
  • भटक्या कुत्र्यांचा प्रश्न: कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्यास नगरसेवकांचा तीव्र विरोध.
  • आजऱ्यात भीषण दुर्घटना: भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी मुलगी ठार, तर एक महिला गंभीर जखमी.
  • महिला आरक्षण व विधानसभा पुनर्रचना: विधेयकांवरून केंद्र सरकारवर टीका; भाजपमधील 'इनकमिंग' थांबल्याची आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया.
  • अजित पवार विमान अपघात चौकशी: शासनाला १० मे पर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा रोहित पवारांचा इशारा.
  • कदमवाडीत गॅस पाईपलाईन फुटली: पाण्याची पाईपलाईन टाकताना दुर्घटना; दीड तास परिसरात दहशतीचे वातावरण.
  • अतिक्रमित घरकुले नियमित: २०११ पूर्वीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित होणार; जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांना फायदा.
  • वृक्षारोपण: कोल्हापुरातील शनिवार पेठेतील ७६ वर्षांच्या 'औदुंबर' झाडाचे यशस्वी पुनर्रोपण.
  • आद्य शंकराचार्य जयंती: २५३४ व्या जयंतीनिमित्त २६ एप्रिल ते १ मे या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • कोल्हापूर पोलीस दलाची प्रतिमा: निरीक्षक पदावरून सुरू असलेल्या वादावरून पोलीस दल बदनाम होत असल्याचा आरोप; शिवसेना (ठाकरे गट) महासंचालकांना जाब विचारणार.

टिप्पण्या