रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ॲप्रन परिधान करत नाहीत?, त्यामुळे रुग्णांना डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यातला फरक कसा समजणार?

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर ॲप्रन परिधान करत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर जिल्हा प्रशासन काय कायदेशीर कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (DMER) निर्देशानुसार शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ॲप्रन परिधान करणे अनिवार्य आहे. हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांच्यामधला फरक ओळखता यावा यासाठी सर्व डॉक्टर्सना त्यांच्या कामाच्या वेळेत ॲप्रन परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच यासोबतच ॲप्रनसोबत ओळखपत्र देखील परिधान करणे अनिवार्य आहे जेणे करून डॉक्टरांचे नाव आणि त्यांचा विभाग कोणता आहे हे रुग्णांना समजले पाहिजे.

मात्र रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात काही डॉक्टर त्यांच्या कामाच्या वेळेत ॲप्रन परिधान करत नसल्याचे दिसून येत असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टिप्पण्या