महानगर गॅस कंपनीच्या कामगिरीबद्दल नगरसेवक सौरभ मलुष्टे आक्रमक, खोदाईचे काम असे काही सुरू आहे की जणू काही तिथे गुप्त धनच सापडणार आहे!
रत्नागिरी नगर परिषदेची आज मासिक सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी महानगर गॅस कंपनीच्या खोदाईच्या कामाबाबत आढावा घेत असताना शहरातील नगरसेवक सौरभ मलुष्टे चांगलेच आक्रमक झाले होते. शहरात ठिकठिकाणी भूमिगत गॅस पाइपलाइनच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी खूप अडचणी येत आहे. काही ठिकाणी नगर परिषदेची घंटा गाडी सुद्धा पोचू शकत नाही. महानगर गॅस कंपनीचे ठेकेदार अशा प्रकारे खोदाई करत आहेत जणू काही त्याच्यात गुप्त धनच सापडणार आहे. गल्लो गल्ली रात्री रस्त्याच्या साईडपट्टया खोदून ठेवतात लोकांना काहीच माहिती नसते. त्यामुळे घरातून गाड्या बाहेर काढणे देखील कठीण होऊन बसते. एखाद्याला रुग्णवाहिका लागली तर खोदाईमुळे ती रुग्णवाहिका रुग्णाच्या घरापर्यंत जाऊन पोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. खोदून झाले की लगेच पाइपलाइन टाकण्यात येत नाहीत. मग खोदाई कशाला करून ठेवतात. लोकांनी तीन तीन वर्षे झाली तरी गॅस मिळत नाही. तर दुसरीकडे जिकडे तीकडे कोणतेही नियोजन नसताना खोदाई करून ठेवली जाते. यापुढे सुधारणा झाली नाही तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका आज नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी सभागृहात घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा