ईराक वरून पाकिस्तानला जाणारे एलपीजी गॅस जहाज बेकायदेशीरपणे जयगड बंदरात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जहाजाचा कप्तान आणि जहाजाचे व्यवस्थापन बघणाऱ्या एका मालकाविरोधात
ईराक वरून पाकिस्तानला जाणारे एलपीजी गॅस जहाज बेकायदेशीरपणे जयगड बंदरात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल
जहाजाचा कप्तान आणि जहाजाचे व्यवस्थापन बघणाऱ्या एका मालकाविरोधात दुसऱ्या भागीदार मालकाची तक्रार
एल पी जी गॅस वाहतूक करणारे “आमिर गॅस" हे जहाज इराणच्या खोर अल झुबेर बंदरातून पाकिस्तानच्या बिन कासिम बंदरात जाण्यासाठी निघाले .. हा एलपीजी गॅस कार्गो दुबईच्या झांग यूनियन इंटरनॅशनल एल एल सी एफ झेड या निर्यातदार कंपनीने पाकिस्तानातील अल पेट्रो गॅस प्रायव्हेट लिमिटेड , लाहोर या कंपनीसाठी इराणच्या खोर अल झुबेर या बंदरात सदर जहाजाच्या टॅन्कमध्ये भरण्यात आला , व हे जहाज पाकिस्तानात जायला निघाले ..
मात्र अचानक जहाजाच्या कप्तानाने या जहाजाचे व्यवस्थापन बघणाऱ्या ब्लू सी मरीन आयएनसी या कंपनीच्या सूचनेवरून सदर जहाजाचा मार्ग बदलला व त्याने जयगड बंदरात बाहेरच्या बाजूला त्याने जहाजाचा नांगर टाकून तेथे जहाज उभे केले .
त्यानंतर या जहाजावरील एल पी जी गॅस जे एस डब्ल्यू जयगड बंदरात उतरविण्यासाठी जहाजाचे एक एजंट ऍटलांटिक ग्लोबल शिपिंग यांनी आवश्यक ती कागदपत्रे संबंधित कस्टम व बंदर खात्याला सादर केली .
हे जहाज जयगड बंदरातील जे एस डब्ल्यू बंदरातील एलपीजी
जेटीला लागण्याचे नियोजन केले जात होते .
मात्र याबाबत जहाजाचे एक भागीदार मालक फतेह मरीन आएनसी यांनी दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी जे एस डब्लू जयगड बंदर , जयगड कस्टम , पोलीस व संबंधित खात्यांकडे त्यांच्या वतीने कायदेशीर काम करणाऱ्या आश्विन शंकर या लॉयर मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे , व सदर जहाज हे बेकादेशीरपणे जयगड बंदरात आणून तसेच जहाजावरील एलपीजी कार्गो बाबत चुकीची कागदपत्रे सादर करून तो कार्गो जयगड बंदरात उतरविण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी तक्रार केली आहे .
फतेह मरिन या कंपनीने आता रत्नागिरीतील युनिक मरीन एजन्सी या कंपनीला आपले अधिकृत एजंट म्हणून नियुक्त केले आहे . युनिक मरीन च्या वतीने सहल कर्लेकर हे याबाबत संबंधित विभागांकडे या जहाजाचे एक भागीदार मालक फतेह मरीन यांची बाजू मांडत आहेत .
पाकिस्तानात जाणारे हे जहाज जयगड च्या दिशेने वळविण्यात आल्याने आता येथील सुरक्षा यंत्रणा कोणती कारवाई करते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा