मुख्य सामग्रीवर वगळा
आजची ठळक वैशिष्ट्ये
- नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून अंबाबाई आणि जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा ऑनलाईन आढावा, सर्व कामं वेळेवर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याच्या सूचना.
- नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, कंपनीचा परवाना रद्द करून लव्ह जिहाद आणि धर्मांतर रॅकेटची साखळी मोडून काढा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.
- गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ७० पेक्षा अधिक अतिक्रमणं हटवली, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विभागाची कारवाई.
- केएमटी बसेसची अपुरी संख्या, नादुरुस्तीचं वाढतं प्रमाण यामुळे प्रवाशांचे हाल, नव्या ई-बसेस लवकरात लवकर केएमटीच्या ताफ्यात येण्याची गरज.
- कडक उन्हाळ्यात देशी फ्रिजला वाढती मागणी, लाल आणि काळ्या मातीच्या माठांची किंमत १० ते १५ टक्क्यांनी वाढली.
- इचलकरंजी महापालिकेला स्वच्छतेसाठी नगरोत्थान योजनेतून मिळालेल्या ११ ई-रिक्षा धूळ खात पडून, अधिकाऱ्यांकडून खाजगी वाहनं भाड्याने घेण्याचा नवा फंडा.
- रखरखत्या उन्हात पिवळा धमक बहावा बहरला, कागल परिसरातील बहाव्याची झाडं देतायत डोळ्यांना सुखावा.
- काँग्रेस बळकट करण्यासाठी आता निष्ठावंतांनाच संधी मिळणार, जिल्ह्यात १३१ पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू.
- औषध दुकानातील महिलेचं १ लाख ३० हजार रुपयांचं मंगळसूत्र हिसकावून नेलं, कागलच्या जयसिंगराव पार्कमधील घटना.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अखिल भारत हिंदू महासभेचा १११ वा वर्धापन दिन साजरा.
- सर्वसामान्य माणसाच्या सहभागातून देशात परिवर्तनाची चळवळ गतिमान होईल, डॉ. अच्युत माने यांचं प्रतिपादन, आंबेडकरी समाज संघटनांच्यावतीने झाली कोल्हापुरात जनप्रबोधन महासभा.
- शाहू मिलचं ८१ कोटी रुपये खर्चाचा अहवाल खासदार शाहू महाराजांना सादर, सूचना घेऊन एक परिपूर्ण अहवाल लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय
- श्री संत गोरोबाकाका कुंभार यांच्या ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरात निघाली रथयात्रा, कुंभार समाज बांधवांचा सहभाग
- मशीनमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू, तर दुसरा कामगार गंभीर जखमी, मजले इथल्या स्टार राईस मिलमधील दुर्घटना
- बसव व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफलं ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जे. एस. पाटील यांनी
- राजेश चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरुवात
- पोलीस ठाण्यात सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन मिळणार, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पुढाकारातून पोलीस अधिकारी आणि पत्रकारांचा झाला सन्मान
- पोलीस असल्याची बतावणी करून गडहिंग्लजमध्ये वृद्धाची फसवणूक, पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
- कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीनं आणि विजय तरुण मंडळाच्यावतीनं शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन
- इचलकरंजीत दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील तिघांसह सहा गुंडांची पोलिसांकडून धिंड
- इचलकरंजीत पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांना मारहाणप्रकरणी चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
- गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या पानपट्टीवर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली २ लाखांची दारू जप्त
- बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन, प्रशासकीय दिरंगाई विरोधात जोरदार घोषणा
- खंडपीठ चषक क्रिकेट स्पर्धेत ॲड. पन्हाळे इलेव्हन सातारा संघ विजेता, तर युनायटेड सिंधुदुर्ग संघाला उपविजेतेपद
- इव्हेंट इंडस्ट्री क्रिकेट लीग स्पर्धेला शानदार प्रारंभ, आजच्या दिवशी विविध संघांचा प्रतिस्पर्ध्यावर विजय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा