चिपळूण येथील डिबीजे वाणिज्य महाविद्यालय येथे शुक्रवारी १७ रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन

चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे डीबीजे वाणिज्य महाविद्यालय येथे शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील वारणा विद्यापीठाचे कुलगुरू, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.(डॉ.) डी.टी.शिर्के व नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार असून यामध्ये शैक्षणिक मिरवणूक, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, स्वागतपर भाषण, प्रमुख पाहुण्यांचे भाषण, अध्यक्षीय भाषण, पदवीदान कार्यक्रम, आभार प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व शिक्षणप्रेमींनी, विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. एम. एस. बापट, प्राचार्य, डी. बी. जे. कॉलेज (स्वायत्त), चिपळूण यांनी केले आहे.

टिप्पण्या

news.mangocity.org