आजची ठळक बातमीपत्र

  • दूधगंगा नदीपात्रात करनूर परिसरात मगरीचा वावर, मासेमारीसाठी गेलेल्या तरूणांनी केलेलं मगरीचं चित्रीकरण व्हायरल, नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
  • रंगपंचमीसाठी वनस्पतीजन्य रंगांचा वापर करावा, निसर्ग मित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचचं आवाहन

  • अनुसुचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्यावतीनं ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार संघर्ष महामोर्चा

  • वन नेशन-वन रेशन कार्ड या योजनेतून धान्य वितरणावर असणारे रेशन धान्य दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध १ एप्रिल पासून हटवणार, केंद्र सरकारचा निर्णय

  • रस्त्याच्या मधोमध आलेल्या विजेच्या खांबांमुळं निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं काम रखडलं, अपघाताचं वाढलं प्रमाण
  • इचलकरंजीत वाळवी लागलेल्या झाडाची फांदी पडून चारचाकी-दुचाकीचं नुकसान
  • पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगार विशाल मांगुरेला अटक, ७५ हजाराचं पिस्टल जप्त
  • अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या टेंबलाईवाडी इथल्या शशिकांत घाटगेला राजारामपूरी पोलिसांकडून अटक
  • राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार संघाचा जुना बुधवार पेठवर २-० गोलनं विजय, दिलबहार उपांत्य फेरीत.ब्रेक फेल झालेल्या टेम्पोमुळं पळापळ, तीन दुचाकींना धडकून टेम्पो झाडावर आदळला, बालिंगा जवळ झालेल्या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान, सुदैवानं जिवितहानी टळली
    धुळवडीदिवशी इचलकरंजीत झाली हुल्लडबाजी, सायकलस्वाराला मारहाण करून अनेक वाहनांची तोडफोड, ताब्यात घेतलेल्या हुल्लडखोरांना पोलिसांनी धडा शिकवण्याची गरज

    भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी

    केवळ सात मिनिटांसाठी झालं कोल्हापूरच्या आकाशात खग्रास चंद्रग्रहण, ग्रहणाबद्दलच्या अंधश्रध्दा दूर करून खगोलीय आविष्काराचा आनंद घेण्याची गरज
    जागरूकता दाखवा-मानसिकता बदला, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोल्हापूरच्या स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर वाढवणं काळाची गरज

    सामाजिक जाणीव आणि दातृत्वाची परंपरा कायम, होळीनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला दान स्वरूपात मिळाल्या तब्बल १ लाख ८१ हजार शेणी
    युध्दामुळं आखाती देशात अडकले कोल्हापुरातील २०७ पर्यटक आणि नागरिक, ८० पर्यटक ६ मार्च रोजी येणार मुंबईत
    युद्धाच्या सावटातून सुखरूप परतले हुपरीचे २३ चांदी उद्योजक, दुबईत दोन दिवस अनुभवले भीतीचे क्षण, मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं मायभूमीत सुखरूप आगमन
    आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आढावा बैठक, राज्याच्या जनगणना संचालिका निरुपमा डांगे यांनी दिल्या स्पष्ट सूचना.

टिप्पण्या