आजचे दिनविशेष

  • कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला जिल्हयात चांगला प्रतिसाद, मोर्चा-निदर्शनं आणि धरणं आंदोलन, राष्ट्रीयकृत बँकांचं कामकाज ठप्प
  • कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ९८४ कोटींचा निधी मंजूर, लवकरच दुहेरीकरणाचं स्वप्न पूर्ण होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

  • बनावट एचएसआरपी नंबर प्लेट तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघड, हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं पोलिसांकडून बनावट नंबर प्लेटसह ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • आंतरराष्ट्रीय घडामोडींचा नकारात्मक परिणाम होऊन शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५५९ अंकांनी, तर निफ्टी १४७ अंकांनी कोसळला, गुंतवणुकदारांचं ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान

  • जमावावर नियंत्रण ठेवणं, घडामोडींचं चित्रीकरण करणं यासह पोलिसांना अन्य सुविधा उपलब्ध करुन देणारी सीसीटीव्ही सव्हॅलन्स व्हॅन आजपासून कोल्हापूर पोलीस दलात दाखल
  • इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांनी स्विकारला पदभार
  • अंमली पदार्थ प्राशन करणाऱ्या टोळीला जाब विचारल्याच्या कारणावरून आंबेवाडीच्या माजी सरपंच आणि उपसरपंचांवर सशस्त्र हल्ला, तीन संशयीतांना करवीर पोलिसांकडून अटक
  • कामगार विरोधी ४ श्रम संहिता मागे घेण्यासाठी इचलकरंजीत कामगार संघटनांचा संप, निदर्शनं
  • राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ, ६ मार्च रोजी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प
  • लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरणाच्या घटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजाकडून निर्वाणीचा इशारा, १३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी.
  • शासन निधीसोबतच लोकसहभागातून कोल्हापूर शहराचा सर्वांगिण विकास करण्यावर आपला भर राहणार, महापौर रूपाराणी निकम यांची माहिती
  • महापौर रूपाराणी निकम यांची बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट, महिला स्वच्छतागृह-ड्रेनेजलाईन आणि रस्ते करण्याला प्राधान्य देण्याची ग्वाही
  • वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्याबद्दल सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल, ५ मार्च रोजी शासनानं भूमिका स्पष्ट करण्यासंबंधीचे आदेश

  • हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं गांजा विक्री करणाऱ्या उमरअली पटेलला ४ किलो १२५ ग्रॅम गांजा आणि मोबाईल-दुचाकीसह घेतलं ताब्यात
  • पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया भीमा कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचं उद्घाटन, कृषी तंत्रज्ञान-शाश्वत शेतींची माहिती आणि जातीवंत पशूपक्षी ठरणार भिमा कृषी प्रदर्शनाचं आकर्षण

  • कोल्हापूर महानगरपालिके समोर नवीन केलेला रस्ता निकृष्ट, उन्हामुळं डांबर वितळल्यानं वाहन घसरण्याचे घडतायत प्रकार
  • सीपीआर आवारातील कोसळलेल्या झाडाची ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून संगनमतानं विक्री केल्याचा दिलीप देसाई यांचा आरोप, लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दाखल
  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८ स्वीकृत सदस्य पदासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं नेले प्रत्येकी ५ अर्ज
  • कोल्हापुरातील कळंबा कारागृहात इम्रान शेख या कैद्यानं कारागृहातील पोलिस विलास पारसे आणि संभाजी कांबळे यांना केली लाथाबुक्क्यांनी मारहाण, जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद
  • गणेशोत्सवात डॉल्बीच्या दणदणाटाद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या राजारामपुरी बाराव्या गल्लीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयानं सुनावली एक वर्षाची शिक्षा

टिप्पण्या