आजची बातमी पत्र

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये होणार स्विकृत सदस्य नियुक्ती,
जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दहा टक्के तर पंचायत समित्यांच्या सदस्य
संख्येच्या २० टक्के होणार स्विकृत सदस्य
राज्य शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करत कोल्हापुरात शिक्षण हक्क
परिषद आक्रमक, शाळा बचाव मोहिमेअंतर्गत राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार
गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेत नवा ट्विस्ट, तुकाराम मुंडेंनी अवसायनात
काढलेल्या १ हजार १०८ दूध संस्थांना अपात्र ठरवण्यासाठी कोल्हापूर सर्कीट
बेंचमध्ये याचिका, ४ मार्च रोजी होणार सुनावणी

कबनुर घटनेच्या निषेधार्थ हिंदुंचा इचलकरंजीत जनआक्रोश मोर्चा, हिंदूची
एकजुट कायम ठेवण्याचं आमदार संग्राम जगताप यांचं आवाहन

पाण्याच्या शोधात आलेला आठ गव्यांचा अख्खा कळप पडला उंदरवाडीच्या.   
        उजव्या कालव्यात, दमलेल्या गव्याच्या पिल्लाला उंदरवाडी ग्रामस्थांनी दिलं जीवदान
                                     राधानगरी तालुक्यातील टिटवे इथल्या तीन पानी जुगारावर छापा, ६७ हजाराची
रोकड, ५ मोबाईल, ९ दुचाकी असं ८ लाखांचं साहित्य स्थानिक गुन्हे
          अन्वेषण शाखेकडून जप्त, आठ जणांना अटक
चेष्टेतून झालेल्या वादातून झाली हाणामारी, एका तरूणावर झाला सशस्त्र हल्ला,शाहूपुरी पोलिसात १५ जणांवर गुन्हा नोंद
कागल नगरपरिषदेचा डिजिटल फलकांवर कठोर निर्णय, नवीन फलकां ना तात्पुरती बंदी, नगरपरिषद सभेत निर्णय.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती, पुढील आदेश येईपर्यंत नवीन प्रशासक नियुक्त करू नये, न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
चंदगड तालुक्यातील खळणेकरवाडीत पहाटे हत्तीचा धुमाकूळ, चारचाकी उडवली हवेत, दुचाकींचा चक्काचूर

विविध साहित्यिक उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन संपन्न
को-फॅक्टर संस्थेच्यावतीनं श्वासात राजं ध्यासात राजं... हा शिवकालीन इतिहास अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न

भागीरथी महिला संस्था आणि इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्यावतीनं सायबर चौकातील आरएसईएमएस ग्लोबल स्कूलमध्ये कळी उमलताना हा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

राम गणेश गडकरी सभागृहात अवतरलं पुन्हा कलामहर्षीचं युग, सुलभा तेरणीकर यांनी उलगडला सिनेमाचा इतिहास
मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कविता आणि गीतांचं राजाराम कॉलेजमध्ये सादरीकरण
मनातील भावना परिपूर्णपणे मांडण्याचा समृध्द राजमार्ग म्हणजे मराठी भाषा, चिकोडे ग्रंथालयातील परिसंवादात उमटला सुर
राजेश चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील अ आणि शिवाजी तरुण मंडळाचा प्रतिस्पर्ध्यावर ४-० गोलनं विजय.

टिप्पण्या