आजच्या ठळक घडामोडी
करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, क्रिकेट मैदानासाठी १२ हेक्टर पेक्षा अधिक शासकीय जमीन उपलब्ध होणार
करिअरची दिशा ठरवणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ, थोडसं दडपण आणि खुप सारा आत्मविश्वास घेवून विद्यार्थी परीक्षेला सामोरे
सीपीआरच्या प्रवेशद्वाराजवळचं भलं मोठं झाड कोसळलं, दोन दुचाकीस्वार जखमी आणि दुचाकीचं नुकसान
कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरातील स्मशान घाट बनला मद्यपींचा अड्डा, पोलिसांनी गस्त घालण्याची गरज
जूनच्या शेवटच्या आठवडयात किंवा जुलैच्या पहिल्या आठवडयात दुसरी टीईटी परीक्षा होणार, शिक्षक होवू इच्छिणाऱ्या किंवा नोकरीत असलेल्या शिक्षकांना या वर्षातील आणखी एक संधी
पंचगंगा नदीलगत शिरोलीपासून ३.५७८ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उड्डाण पुलासाठी १ हजार ९१३.७० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी, नामदार नितीन गडकरी यांच्या माहितीमुळं कोल्हापुरकरांची प्रदिर्घ काळची मागणी पूर्ण होणार
इथेनॉल टैंकरला भीषण आग, टँकरमधून इथेनॉलची गळती सुरू झाल्यानं कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक वळवली, सुदैवानं जिवितहानी नाही
पुणे-बंगळूर महामार्गावर रोजच होतीय वाहतूक कोंडी, कागल ते कोल्हापूर आणि वाठार ते टोप दरम्यान हजारो वाहनं रस्त्यावरच अडकली, महामार्गावरून प्रवास म्हणजे जणू शिक्षा
अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याला शॉर्टसर्किटमुळं भीषण आग, इचलकरंजीतील दुर्घटनेत १ कोटी ७० लाखाचं नुकसान. .केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद झाल्यानं कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला गती मिळणार
एमबीए आणि एमसीएचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डीटीईची परीक्षा देणं बंधनकारक, विद्यार्थ्यांनी तातडीनं वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावेत, केआयटी प्रशासनाचं आवाहन
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न, ५०० पेक्षा अधिक रक्तदात्यांचा सहभाग
इचलकरंजी महापालिकेकडून बांधलेल्या नव्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं उद्घाटन, विकासाचं व्हिजन ठेवून काम करा, निधीची कमतरता भासणार नाही, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
महाशिवरात्री निमित्त श्री सिध्दगिरी मठावर देशी गाय आणि देशी बैलांचं प्रदर्शन होणार, ५१ हजार रूपयांचा कामधेनू आणि महानंदी पुरस्कार देण्यात येणार
घरफाळा थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचना, जनगणनेच्या कामकाजाही घेतला आढावा
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाटयशास्त्र विभागाच्यावतीनं आयोजित राजर्षि शाहू संगीत रजनीचा झाला शुभारंभ, दोन दिवस कलारसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी
कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान संघाची निदर्शनं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा