आजचे दिनविशेष

               आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेणं उचित नाही, सर्वोच्च न्यायालयाची टिपणी, राज्यातील २२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी रखडल्या
महाराष्ट्रावर वळीव पावसाची छाया, ढगाळ हवामान आणि विजा कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं बळीराजा चिंताग्रस्त, फेब्रुवारी महिन्यातच अवकाळी पावसाची हजेरी असल्यानं काढणीला आलेल्या पिकांना धोका

शक्तिपीठ महामार्ग विरोधात संघर्ष समितीची राजव्यापी निदर्शनं, १२ जिल्हयातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सरसकट रद्द करा, या मागणीसाठी झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणातून इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं दगडफेक, संतप्त जमावाकडून झालं रास्तारोको आंदोलन, पोलीस निरीक्षक आणि ४ होमगार्ड जखमी, ५३ जणांवर गुन्हे दाखल

अंधश्रध्देवर प्रहार करत, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, जातीभेद निर्मूलन, अनिष्ठ प्रथा यावर प्रबोधन करणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंती 
         व्यक्तीगत स्वार्थासाठी प्रशासनाचा बळी जाऊ देणार नाही, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांचा स्पष्ट इशारा
शिवाजी विद्यापीठात रतन टाटा कौशल्य विकास केंद्र उभारू, नामदार उदय सामंत यांची घोषणा, विद्यापीठाच्यावतीनं झालेल्या महारोजगार मेळाव्यात १७ हजार पेक्षा अधिक उमेदवारांचा सहभाग
हातकणंगले तालुक्यातील रामलिंग इथल्या डोंगराला रविवारी लागली आग, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी यांना आगीची मोठी झळ, आगीच्या कारणाबाबत संभ्रम
        संगीतोपचार आणि त्यामागचे विज्ञान, सहभाग - संतोष घाटपांडे .... पुनः प्रक्षेपण: मंगळवारी सकाळी १० वाजताजागतिक रोटरी दिनानिमित्त कोल्हापुरात पार पडली मोटरसायकल रॅली, सामाजिक समता आणि प्रबोधनाचा संदेश देत रॅलीनं केली जनजागृती
कोल्हापुरात झाल्या म्हैशी आणि रेडकू पळवण्याच्या शर्यती, भरघोस बक्षिसांच्या स्पर्धेला मिळाला उदंड प्रतिसाद
शिवसैनिक विशाल देवकुळे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करू, पक्ष त्याग केलेल्या किंवा बंडखोरी करणाऱ्यांनी चिंता करू नये, शहर प्रमुख सुनील मोदी यांचा पलटवार

नवी दिल्लीत झालेल्या एआय परिषदेत काँग्रेसनं केलेल्या अर्ध नग्न आंदोलनाच्या विरोधात भाजपची जोरदार निदर्शनं, काँग्रेसनं आपला खरा चेहरा दाखवल्याची टीका
दाजीपूर आणि फोंडाघाटात रविवारी रात्री संततधार, वाढत्या उष्णतेनंतर अवकाळीची चाहूल, रब्बी पिकांवर संकट

कार आणि मोटरसायकल यांच्यात कागल सीमा तपासणी नाक्याजवळ झाला अपघात, मोटरसायकलवरील सोनगे इथले रामदास पाटील जखमी, तर अन्य एकजण किरकोळ जखमी
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमला आंदोलकांच्या घोषणांनी, धरणे आंदोलन, निदर्शनं, उपोषण आणि शंखध्वनीमुळं आजचा दिवस ठरला आंदोलन दिन
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी इचलकरंजीत वारकरी संप्रदाय भक्त मंडळाचं बेमुदत उपोषण
संधी साधून घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या मानसी खरे हिला लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अटक, सुमारे सव्वा तीन लाखांच्या चांदीच्या मूर्ती जप्त.

टिप्पण्या