आजच्या घडामोडी
- कोल्हापूर महापालिकेच्या ८ स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून ३, काँग्रेसकडून ३ तर शिंदे शिवसेनेच्यावतीनं २ उमेदवारी अर्ज दाखल, २० फेब्रुवारीच्या महासभेत निवडीवर होणार शिक्कामोर्तब
- माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी महापालिकेचा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, सात कोटीचं बक्षीस जाहीर
- माझी वसुंधरा अभियानात कागल नगरपरिषदेचा राज्यात दुसरा क्रमांक, तीन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर, कागलच्या स्वच्छता आणि पर्यावरण उपक्रमांचा सन्मान
- आक्रमक तरुणाकडून लक्ष्मीपुरीतील हॉटेल स्वस्तिकची तोडफोड, हॉटेल मालकाला मारहाण, भर दिवसा झालेल्या प्रकारामुळं सुमारे अर्धातास प्रचंड वाहतूक कोंडी
- टिपु सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीनं जोरदार निदर्शनं, इचलकरंजीत निघाला निषेध मोर्चा
- इचलकरंजीजवळच्या तारदाळ इथं घरात घुसून मारहाण करत दागिने लंपास, जबरी चोरीमुळं ग्रामस्थांमध्ये भीती
- टेंपो आणि मोटरसायकल यांच्यातील अपघातात कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमधील विवेकानंद शेटी गंभीर जखमी, कागल-निढोरी रस्त्यावर पिंपळगांव खुर्द इथं झाला अपघात
- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून झाले विविध उपक्रम, मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाची सांगता
- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरून महायुतीमध्येच रस्सीखेच, भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा असेल तर राष्ट्रवादीला कोल्हापूरचं महापौर पद मिळावं, नामदार हसन मुश्रीफ यांची गुगली
- १९३३ सालच्या कुरुक्षेत्र चित्रपटाचा खास शो २२ फेब्रुवारीला पद्मा थिएटरमध्ये मोफत दाखवणार, हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरचा अनोखा उपक्रम
- कौटुंबिक वादातून मारहाण झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, सोमवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांकडून पती गणेश हुबळेला अटक, २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
- सुनित परिख, नलिनी नेने, विवेक शेटे, दुर्गेश तोडकर आणि प्रताप पाटील यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून पुरस्कार जाहीर
रस्त्यात सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या फुलेवाडीतील फिरोज मुजावरला एलआयसी कर्मचाऱ्यांकडून सायकल भेट
कोल्हापुरातील श्री पुजकांनी आयोजित केलेल्या मंदिर प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेत श्री क्षेत्र जोतिबा संघ विजेता, तर श्री क्षेत्र अंबाबाई अ संघ ठरला उपविजेता
छत्रपती चषक टर्फवरील फुटबॉल स्पर्धेत टायब्रेकरमध्ये कसबा बावडा संघाचा विजय
पर्यावरण संतुलनाची चळवळ प्रत्येकाच्या जीवनाशी जोडली गेली तरच भविष्यात मानवी जीवन सुसह्य, पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांचं मत
आरटीई प्रवेशासाठीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु, एक किलोमीटरच्या आतील शाळा निवडण्याची अट विद्यार्थी आणि पालकांसाठी ठरतीय अडचणीची
सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीनं आयोजित फोर्टी प्लस कोल्हापूर सिनीयर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ, ज्येष्ठ खेळाडूंना संधी
कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत इथल्या वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर रंगला छात्रसैनिकांचा मेळा, शिस्तबध्द संचलनातून झाला देशभक्तीचा जागर
गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वरमध्ये घरफोडी, १४ लाखांचे दागिने लंपास गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल
राजर्षि छत्रपती शाहू महाराज वस्तुसंग्रहालयाचा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा व्हावा, कोल्हापुरातील शाहू प्रेमींची मागणी
इचलकरंजीतील घंटागाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन
इचलकरंजी महापालिका सभागृह नेतेपदी विठ्ठल चोपडे यांची नियुक्ती
शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत टीव्ही, फ्रिजसह प्रापंचिक साहित्याचं लाखाचं नुकसान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ केल्या उपाययोजना
स्वच्छतेसह कार्यालयीन कामकाज पारदर्शीपणे करावं, महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रशासनाला सूचना, दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेत भरवणार जनता दरबार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा