आजच्या ठळक घडामोडी

रविवारच्या सु‌ट्टीमुळं भिमा कृषी प्रदर्शनस्थळी विक्रमी गर्दी, तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल
केंद्र सरकारच्या शहर पायाभूत सुविधा योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करु, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येणार, मित्रपक्ष आणि आघाड्यांचं संख्याबळ एकत्र केल्यास भाजपच ठरेल मोठा भाऊ, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांना अप्रत्यक्ष इशारा

भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्या, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सल्ला
भाजपचा जनाधार दिवसेंदिवस वाढता, आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक भाजप लढवणारच, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेते पदी तानाजी पाटील यांची सर्वांनुमते निवड
महाशिवरात्रीनिमित्त भक्ती आणि शक्तीचा जागर, ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी, कणेरी मठ आणि वडणगे इथल्या शिवमंदिरात भक्तीचा जागर
गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभलंच्या गजरात झाला जोतिबाचा दुसरा खेटा, दख्खनच्या राजाची सरदारी रूपात बैठी पूजा
कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची मुदत सव्वा वर्ष असेल, समाजातील विविध घटकातील मान्यवरांना संधी मिळणार, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव मध्ये सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकललं, अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, संशयित प्रविण चिंचेवाडीवर गुन्हा दाखल.                           पुढीलवर्षी सांसद खेल महोत्सवामध्ये जिल्हयातील ५० हजार खेळाडूंचा सहभाग होण्याच्या दृष्टीनं नियोजन, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती,                                                                         भिमा कृषी प्रदर्शनामध्ये सांसद खेल महोत्सवांतर्गत झालं पुरस्कार वितरण.                           
आता महाराष्ट्रात आयपीएलच्या धर्तीवर फ्रेंचाईजी पध्दतीनं महाराष्ट्र फुटबॉल लीगचं आयोजन, कोल्हापूर स्पोर्टर्स असोसिएशन, विफा आणि प्रो स्पोर्टर्स प्रा. लिमिटेडच्या पुढाकारातून १० वरिष्ठ संघात रंगणार फुटबॉल सामने
शेतकऱ्यांसाठी शेती विषयक योजनांची प्रात्यक्षिकं आणि एआयच्या माध्यमातून बनवलेलं शेतीचं मॉडेल ठरलंय विशेष आकर्षण, भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांची कृषी विभागाच्या स्टॉलवर गर्दी

पश्चिम महाराष्ट्रातून भिमा कृषी प्रदर्शनात आलेल्या सुमारे ५ हजार शेतकरी आणि नागरिकांना मोफत झुणका-भाकरीचं वाटप, भागीरथी महिला संस्थेसह विविध संस्थांचा उपक्रम

करवीर तालुक्यातील वडणगेमध्ये शंकर-पार्वती यात्रा भक्तीभावानं संपन्न, तर कणेरी इथल्या श्री सिध्दगिरी मठावर महाशिवरात्री उत्सवाला उत्साहात प्रारंभ
भिमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात कोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी
केंद्र सरकारच्या शहर पायाभूत सुविधा योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करु, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध खाद्य पदार्थांवर नागरिकांचा ताव, सर्वच स्टॉल्सवर प्रचंड गर्दी, बचत गटांनी मानले सौ. अरुंधती महाडिक यांचे आभार
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये लावलेल्या कृषीविषयक साधनं, औजारं आणि शेतीपुरक व्यवसायासाठीच्या वस्तुंची मोठ्याप्रमाणात विक्री, विक्रेत्यांमधून समाधान
कोल्हापुरातील ९ वर्षाचा हिंद केसरी हरण्या बैल ठरतोय भिमा कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण, हरण्या भोवती होतीय चाहत्यांची  तुफान गर्दी

टिप्पण्या