आजचे बातमीपत्र

           बेशिस्तपणाचा कहर, कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेचं प्रदूषण रोखण्याऐवजी काही महाभागांकडून प्रदूषणात भर, कचरा आणि निर्माल्य टाकण्यासह जनावरं, वाहनं आणि कपड़े धुणं बंद करण्याची गरज
         कोल्हापूर बाजार समितीच्या आवारातील मोक्याच्या जागेवर संचालकाचा डोळा, पेट्रोल पंपाची प्रस्तावित जागा लीजवर घेण्याचा प्रयत्न

संत गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न, भाविकांकडून गण गण गणात बोतेचा गजर, ठिकठिकाणी झुणका-भाकर प्रसादाचं वाटप, दर्शनासाठी प्रचंड गर्दी

चांगभलंच्या गजरात... दख्खनचा राजा श्री जोतिबाची खेटे यात्रा सुरू, पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी घेतलं देवदर्शन, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
पुनः प्रक्षेपण 
          कोल्हापूरच्या भाजी मंडईत गवार, हिरवी मिरची आणि घेवड्याच्या दरात तेजी, गवारीची वाटचाल दीडशे रुपयांकडं, हिरव्या मिरचीनं गाठली शंभरी, मात्र पालेभाज्यांच्या दरात घसरण
इचलकरंजीजवळ कबनूर-तारदाळमध्ये निवडणुकीदरम्यान वाद-मारामारी, २४ जणांवर गुन्हे दाखल
पंचगंगा नदीसह जिल्हयातील १० नद्यांमधील गाळ काढण्याचा प्रश्न मार्गी, पाटबंधारे विभागानं मंजुरीसाठी पाठवला प्रस्ताव
ईस्ट ऑर वेस्ट... सायकलींग इज बेस्ट... वयाच्या साठीनंतरही २ हजार ७०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करत कोल्हापूरच्या चौघांनी दिला व्यायामाबरोबरच सामाजिक सलोख्याचा संदेश.
            कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचं सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून चॅनल बी वरुन होणार थेट प्रक्षेपण,         दर्शकांना घरबसल्या पाहायला मिळणार विश्वासार्ह आणि जलद निकाल

            फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार दहावी-बारावीची परीक्षा, सीसीटीव्ही नसणाऱ्या परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार

                  नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेनं भारताच्या विज्ञान क्षेत्राची वाटचाल, डॉ. प्रकाश पवार यांचं मत

          इचलकरंजी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची पहिली सभा नव्या सभागृहात होणार
           गेल्या दोन दिवसात एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतलं श्री अंबाबाई देवीचं दर्शन, परीक्षा कालावधीमुळं गर्दीवर आल्या मर्यादा
             खासदार धनंजय महाडिक आयोजित सांसद खेल रत्न महोत्सवांतर्गत प्रतिभानगर इथल्या स्केटिंग रिंगवर उत्साहात झाली स्केटिंग स्पर्धा
        जिल्हा परिषदेला नव्या कारभाऱ्यांचे वेध, अध्यक्षांचं दालन आणि सभागृहाचं नूतनीकरण तसंच पदाधिकारी निवासस्थानांचीही रंगरंगोटी.

टिप्पण्या