नागपूर विभागीय स्पर्धेत वेलगूरच्या खेळाडूंचा डंका@ गडचिरोली संघ अव्वल.

नागपूर विभागीय स्पर्धेत वेलगूरच्या
 खेळाडूंचा डंका@ गडचिरोली संघ अव्वल.       
By- दीपक चुनारकर (वेलगूर)         

 महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना जिल्हा गोंदिया च्या वतीने 25 जानेवारी रोजी पंचायत समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया भव्य क्रीडांगणावर 14 वर्षाखालील मुले मुली यांची नागपूर विभागीय वाली स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या संघाने सहभाग घेतला. गडचिरोली मुले संघात वेलगुर येथील खेड्यांची निवड करण्यात आली. यात सौरव तानाजी मराठी( कर्णधार), सनम दीपक राऊत ( उपकर्णधार ), समीर जागेश्वर मराठे - राजेधर्मराव हायस्कूलचे विद्यार्थी. ओम आनंदराव वसाके, आयुष नानाजी सातारे, आयुष अनुपम वसाके - जिल्हा परिषद केंद्र शाळा वेलगुरूचे विद्यार्थी, व क्षितिज देवानंद गदेकर - राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली चा विद्यार्थी, या खेळाडूंचा समावेश होता. प्रशिक्षक श्री यशोधन जयंत गजभिये सर वेलगूर व श्री अमित शेंडे सर व्यवस्थापन आष्टी, यांच्या मार्गदर्शनामुळे व अथक परिश्रमामुळे या विभागीय स्पर्धेत गडचिरोली संघांनी नेत्रदीपक खेळ खेळत 14 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक व मुलीच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला व नागपूर विभागीय स्पर्धेत मानाचा तुरा रोवला. गडचिरोली मुलांच्या संघ राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नागपूर विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेलगुरूच्या संघाला ब्लू स्टार क्लब वेलगुर व न्यू स्टार क्लब वेलगूर यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले तसेच अहेरी पत्रकार संघटनेचे सदस्य श्री दीपक चुनारकर यांनी सहकार्य केले व श्री अमोल दुर्गे यांनी कमी खर्चामध्ये स्वतःच्या गाडीची व्यवस्था करून या स्पर्धेत खेळाडूंना उपस्थित केले. 14 वर्षाखालील वालीपाल संघातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गडचिरोली संघाचा माननीय आ.श्री राजकुमार राजकुमार बडोले साहेब माजी मंत्री तथा आमदार अर्जुनी मोरगाव व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम व तृतीय क्रमांकाचे आमदार चषक व सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. प्रजासत्ताक दिनी वेलगुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वेलगुर, राजे धर्मराव हायस्कूल वेलगूर.ग्रामपंचायत वेलगूर यांच्या कडून सत्कार करण्यात आले.

टिप्पण्या