कुडली,सडेजांभारी,शिवणे, असोरे,आबलोली या पाच ग्रामपंचायतींना आनंद शिवराम जाधव यांनी आई - वडिलांच्या स्मरणार्थ दिली भारतीय राज्य घटना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट

आबलोली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक,राजकीय,धम्म आणि शैक्षणिक चळवळीत निस्वार्थीपणे, कर्तव्यदक्ष, एकनिष्ठ,कार्यतत्पर कठीण समयी खंबीरपणे ऊभे राहणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू कार्यकर्ते गुहागर तालुक्यातील कुडली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणारे, कुडली गावचे सुपूत्र कालकथीत आदरणीय शिवराम पांडूरंग जाधव आणि त्यांना खंबीरपणे सावली सारखी साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी कालकथीत आदरणीय प्रभावती शिवराम जाधव या आपल्या आई - वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे धाकटे चिरंजीव आदरणीय आनंद शिवराम जाधव यांच्या संकल्पनेतून आई - वडिलांचा सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक व आर्थिक वसा पुढे चालवीत असून गुहागर तालुक्यातील कुडली,सडेजांभारी,शिवणे, असोरे,आबलोली या पाच ग्रामपंचायतींना आनंद शिवराम जाधव यांच्या कडून मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्य घटना व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली.यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद शिवराम जाधव यांनी केले. 
                   गुहागर तालुक्यातील कुडली ग्रामपंचायत येथे पंचशिल बौद्ध विकास मंडळ कुडलीचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव,पंचशिल बौद्ध विकास मंडळ कुडली या मंडळाचे सल्लागार व महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनंत कांबळे,तंटामुक्ती समीती अध्यक्ष अनिल जाधव,रविंद्र जाधव, तुकाराम शिवराम जाधव,आनंद शिवराम जाधव,कु.साक्षी आनंद जाधव आदी.मान्यवरांच्या उपस्थितीत कुडलीचे सरपंच नितीन शंकर गावणंग ,ग्रामपंचायत अधिकारी हरिष कुळ्ये व ग्रामपंचायत सदस्य तसेच सडेजांभारी ग्रामपंचायत येथे सडेजांभारीच्या सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर,ग्रामपंचायत अधिकारी अपूर्वा हुमणे,पोलिस पाटील प्रभाकर सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुर्वे, नुतन पवार आणि ग्रामस्थ तसेच आबलोली ग्रामपंचायत येथे सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके,ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,तंटामुक्ती समीती अध्यक्ष आप्पा कदम,उपसरपंच अक्षय पागडे बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम,ग्रामपंचायत सदस्य संजय कदम आदी.मान्यवरांचे उपस्थितीत भारतीय राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली
                      तर गुहागर तालुक्यातील असोरे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा शाखा तालुका गुहागर ,बौद्धजन सेवा संघ असोरे या पक्ष व धम्म संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवात आनंद शिवराम जाधव यांनी असोरे, शिवणे या ग्रामपंचायतीसाठी प्रमुख मार्गदर्शक आणि पाली भाषेचे अभ्यासक व प्राध्यापक विजयराव मोहिते,बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम,भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंतराव मोहिते,सल्लागार एस. एल. सुर्वे, काशिनाथ सुर्वे,दिलीप सुर्वे, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष आप्पा कदम आदी. मान्यवरांकडे भारतीय राज्य घटना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी कालकथीत आदरणीय शिवराम पांडूरंग जाधव,कालकथीत आदरणीय प्रभावती शिवराम जाधव यांच्या लोकोपयोगी समाज कार्याचा गौरव करण्यात आला.

टिप्पण्या

news.mangocity.org