वेलगुर येथे"आतरराष्ट्रीय महिला दिन "साजरा!*

** वेलगुर येथे"आतरराष्ट्रीय महिला दिन "साजरा!*
By -दिपक चुनारकर गडचिरोली (वेलगूर )
  दिनांक ८मार्च २०२५ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, वेलगुर येथे " आंतरराष्ट्रीय महिला दिन " साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे श्री प्रभाकर आचेवार यांनी भुषविले तर, कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. हर्षाताई दिपकराव चुनारकर यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सौ.उर्मिला राजुरकर, वंदनाताई चौधरी यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु.मिनाक्षीताई कुमरे, कु.वंदनाताई ऐलावार, कु.शारदाताई रापर्तीवार ,कु.प्रियंका चुनारकर मँडम, श्री रमेश कुसनाके सर, श्रीमती शकुंतलाताई गुरनुले यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु.मिनाक्षीताई कुमरे यांनी करुन " आंतरराष्ट्रीय महिला दिना " ची पार्श्वभूमी अंकीत केली. या प्रसंगी गावातील जवळपास २५महिलांनी आपला सहभाग दर्शविला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री गणेश सुर्तेकर यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री रमेश कुसनाके सर यांनी मानले.या प्रसंगी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी " महिला गौरव " या विषयावर आपले मत व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments