*L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत!*
लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
यानंतर आता कंपनीला मोठा फटका बसला असून, त्यांचे तब्बल ७०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने नियमांचे पालन न केल्याचे कारण देत सहा पाणबुड्या बांधण्यासाठी एल अँड टी ची निविदा रद्द केली आहे.*
एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे, असे विधान केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. या प्रकरणावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
एल अँड टीने स्पॅनिश सरकारची जहाजबांधणी कंपनी नवांटियासोबत भागीदारीत, प्रोजेक्ट ७५ इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाला सहा प्रगत पाणबुड्या बांधून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रगत पाणबुड्या तीन आठवड्यांपर्यंत पाण्याखाली राहण्यासाठी डिझाइन करण्यात येणार होत्या. असे वृत एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Defence Ministry finds L&T proposal non-compliant in Rs 70,000 cr
*७० हजार कोटी रुपयांचे नुकसान*
निविदा तपशीलांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, एल अँड टीने भारतीय नौदलाच्या जहाजांच्या आवश्यकता पूर्ण न केल्यामुळे या प्रकल्पाची निविदा नाकारण्यात आली. यामुळे एल अँड टी या बहुराष्ट्रीय उद्यग समूहाचे ७०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एल अँड टी व नवांटियाने स्पेनमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणालीचे प्रात्यक्षिक भारतीय नौदलाला दाखवले होते, परंतु हे किनाऱ्यावर आधारित प्रात्यक्षिक होते. भारतीय नौदलाच्या निविदेसाठी समुद्रात आधीच सिद्ध झालेली प्रणाली आवश्यक होती.
*आता माझगाव डॉक एकमेव दावेदार*
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यामुळे आता भारतीय नौदलासाठी सहा पाणबुड्या बांधण्याच्या करारासाठी सरकारी मालकीची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि तिची भागीदार, जर्मनीची थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स, एकमेव उरलेली दावेदार म्हणून उरली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment