प्रयागराज कुंभमेळ्यात भीषण आग अनेक तंबू जळून खाक

◼️ फ्रेश न्युज ◼️

*प्रयागराज महा कुंभमेळ्यात भीषण आग आणि तंबू जळून खाक* 
दि.19/01/25
*उत्तर प्रदेश*- प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात अनेक तंबूंना आग लागली. त्‍यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटने त सुमारे २५ तंबू जळून खाक झाल्‍याचे प्राथमिक वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत,स्थानिक अधिकाऱ्यांनी, पोलिस आणि अग्निशमन दलांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.

आज दुपारी एका तंबूला आग लागली. काही क्षणात परिसरात अनेक तंबूंना आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची एक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
      

Comments