*कळझोंडी येथे विद्युत पोल कोलमडून पडल्याने नळपाणी पुरवठा योजना खंडीत*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*कळझोंडी येथे विद्युत पोल कोलमडून पडल्याने नळपाणी पुरवठा योजना खंडीत*
      
तालुक्यातील कळझोंडी फाटा क्रमांक २ येथील विद्युत पोल मोडून जमिनीवर पडल्याने येथील विद्युत तारा जमिनीवर पडल्या असून गेले १८ तास या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जयगड प्रादेशिक नळ पाणी योजना बंद पडली असल्याने येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे
      
याबाबतचे वृत्त असे की, शुक्रवारी रात्री ११ वाजता येथील पोल मोडून पडला व पोल वरील विद्युत तारा जमिनीवर पडल्या त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला ऐन २६ जानेवारीच्या पूर्व संध्येलाच वीज वितरण पुरवठ्यामध्ये खंड पडल्याने येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनांक २५ रोजी सकाळी नऊ वाजता येथील घटनास्थळी कळझोंडी गावचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार व सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी भेट दिली. या परिसरात अनेक पोल गंजलेले आहेत. याबाबत ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वीज वितरण कंपनीला यापूर्वी अनेकदा अर्ज विनंत्या करून झालेल्या आहेत. मात्र या परिसरातील गंजलेले पोल अद्याप बदलण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या भागात काही दुर्घटना व अपघात घडल्यास येथील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत. 

चार दिवसांपूर्वी याच परिसरात विद्युत पोलवर तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या होत्या. प्रचंड वेगाने वणवा पसरला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुंदरवाडी लोक वस्तीत असलेले विद्युत पोल गंजलेले असून अचानकपणे रात्री अपरात्री हे पोल मोडले. तर जिवीत हानी होऊ शकते, याबाबत ही वीज वितरण कंपनी खंडाळा यांना कळविण्यात आले आहे. 

तरी या कळझोंडी फाटा क्रमांक २ आर.के. मुळ्ये ते हरी फाटा -लोहारवाडी या परिसरातील विद्युत पोलवर होणारे (स्पार्क) घर्षण व त्यानंतर उद्भवणाऱ्या वणव्यांना आवरण्यासाठी येथील विद्युत तारा सुरक्षितपणे ताणलेल्या आहेत का? याबाबतही त्वरित पहाणी करण्यात यावी. जर का ठिणग्या उडण्याचे प्रकार थांबविण्यात आले नाहीत, तर मात्र मोठ जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. उद्या दिनांक २६  जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे वीज वितरण पुरवठा लवकरच सुरळीत चालू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments