मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम यशस्वी

पोलादपूर प्रतिनिधी सिताराम कळंबे - सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एक भुईकोट किल्ला म्हणून दुर्ग कांगोरीगड हा ओळखला जातो. या गडावर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.स्वराज्यामधील ३६५ किल्ल्यांमधील दुर्ग कांगोरीगड या गडावर दोन दिवस मावळा प्रतिष्ठान पोलादपूर या संघटनेद्वारे द्वितीय वर्धापन दिन व संवर्धन मोहीम क्रमांक १६ राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये १०० ते १




५० कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यात तीन लहान मुले आणि एका मुलगीही  झालेली होती.गड संवर्धनाची सुरुवात गडावरील असलेल्या कांगोरी मातेच्या पुजनाने करण्यात आली. गड पूजन करून ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र घेऊन स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. दोन दिवसाच्या कामाच्या अथक प्रयत्नाने गडाने मोकळा श्वास घेतला. काम पूर्ण झाल्यानंतर मोहिमेला आलेल्या सर्वांनी भंडारा उधंळून मोहिमेचा आनंद साजरा केला.मावळा संघटनेचे योगेश केसरकर, सचिन चव्हाण,, प्रथमेश कदम, निलेश मोरे, दिनेश मोरे, विक्रम गारगोटे,महेश गुरव,संजीवनी सावंत, अंजली कळंबे आदीच्या उपस्थित मध्ये मोहीम फत्ते करण्यात आली.

Comments