महाराष्ट्रातील चार दिगग्ज कलावंतांनी दुबई मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले




सुनीलजी महाराज मेस्त्री

अंकुश महाराज कुमठेकर यांचा सत्कार


प्रतिनिधी सिताराम कळंबे- दुबई मधील ग्लेनडल इंटरनॅशनल स्कुल मध्ये गेल्या अनेक वर्षे श्री गणेश भजन मंडळ शाहजहा दुबई अध्यक्ष श्री विठोबा अहिरे काका यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय भजन मंडळ स्थापन केले. सर्व भारतीय महाराष्ट्रीयन एकत्र येऊन कीर्तन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात.हा महोत्सव दिनांक १२जानेवारी२०२५ रोजी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार तुकाराम महाराजांचे ११वे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे  ह.भ.प.उद्दबोध महाराज पैठणकर यांच्या कीर्तनाला गायनाची साथ ह.भ.प.अंकुश महाराज कुमठेकर(कोकणरत्न),ह.भ.प.परमेश्वर महाराज वरखड(देवाची आळंदी) तसेच मृदुंगाची साथ पाखवजच्या नामांकित घराण्यातील मृदुंगमहर्षी ह.भ.प.सुनीलजी महाराज मेस्त्री,ह.भ.प.विठ्ठल महाराज मांढरे(रायगड भूषण)या कलावंतांनी दुबई मधील सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला सर्व भारतीय उपस्थित होते

Comments